शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

याला विकासाची वाट म्हणावी की विनाशाची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 03:59 IST

अतिवेगाने प्रवास करण्याच्या वेडापायी सर्वत्र सिमेंटचेच रस्ते विनाशासाठी सज्ज आहेत. याला विकास म्हणावा की हट्टीपणा?

- विजयराज बोधनकरएकदा एका गावात वेगळ्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावयाचा होता. गणेश चतुर्थीच्या दिवशी गावात वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करायचे होते. परंतु अडचण अशी निर्माण झाली की गावात झाडे लावण्यासाठी जमीनच शिल्लक नव्हती. विकासाच्या नावावर मातीच्या देहावर सिमेंटचे पक्के झाकण लावून तिला मुकी-बहिरी, आंधळी केली होती. शेकडो वर्षांपासून आपला मातीशी ऋणानुबंध आहे. मातीत खेळत अनेक पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्यात. पावसाळा व हिवाळ्यात गावातल्या रस्त्याच्या दुतर्फा गवत आणि अन्य वनस्पती उगविण्याचे आता पूर्णपणे बंद झाले आहे. थंडावा देणारी मातीची घरे पाडून तिथे निर्जीव सिमेंटची टोलेजंग घरे गावातही उभी राहू लागली आहेत.खरेतर, माती आणि माता या दोन्ही जन्मदात्या; पण या दोघींनाही ग्रहण लागले. मातेची मम्मी झाली आणि मातीला सिमेंटची जेल झाली. शहरात तर माती अंगावरच्या तिळाइतकी शिल्लक आहे. निसर्गाच्या मूलभूत घटकांचीच मानवाला अडचण होऊ लागली. आपल्या संस्कृतीत पंचमहाभूते म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, हवा आणि अवकाश हे केंद्रस्थानी आहे. पावसाचे पाणी मातीत मुरले जाऊन विहिरीच्या झऱ्यातून शुद्धीकरण होऊन पिण्याच्या कामी यायचे. मातीत मुरलेल्या पाण्यामुळे शेती व आजूबाजूचे शिवार हिरवेगार राहून उत्तम प्राणवायूचा पुरवठा होत राहायचा. डोंगरदऱ्यांत पडलेले पावसाचे पाणी सतत नदी-नाल्यांतून वाहत राहायचे. आज मानवी स्वार्थापायी डोंगरच्या डोंगर उद्ध्वस्त होताना दिसताहेत, तिथे पाऊस तरी कसा कोसळणार? त्याचमुळे पृथ्वीवरच्या उष्णतेने उच्चांक गाठला आहे. बारमाही थंड असलेली गावे आता आग ओकू लागली आहेत. अतिवेगाने प्रवास करण्याच्या वेडापायी सर्वत्र सिमेंटचेच रस्ते विनाशासाठी सज्ज आहेत. याला विकास म्हणावा की हट्टीपणा?

टॅग्स :spiritualअध्यात्मिक