शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

योगाभ्यास, ध्यानसाधनेचं महत्त्व जोडीदाराला कसं पटवून द्यावं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 04:17 IST

तुम्ही करत असलेला योगाभ्यास, ध्यानसाधनेशी तुमचा जोडीदार सहमत नसेल, तर काय करावं आणि याचं महत्त्व जोडीदाराला कसं पटवून द्यावं?

- सद्गुरू जग्गी वासुदेवतुम्ही करत असलेला योगाभ्यास, ध्यानसाधनेशी तुमचा जोडीदार सहमत नसेल, तर काय करावं आणि याचं महत्त्व जोडीदाराला कसं पटवून द्यावं? तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक प्रक्रियेत जोडीदाराचं सहकार्य हवं असेल, तर तुम्ही तुमची आध्यात्मिक प्रक्रिया त्याच्यासाठी फायदेशीर बनविली पाहिजे. योगाभ्यासामुळे तुम्ही किती उत्साही, आनंदी आणि अद्भुत झालात हे त्याने पाहिलं पाहिजे. मग तो म्हणेल, ‘चल, ध्यान करू या! तू आज तुझी ध्यानधारणा केलीस का?’ परंतु तुमची आध्यात्माची संकल्पना जर तुमच्या कुटुंबाला असं सांगण्याची असेल की, ‘मी आजपासून जेवण बनवणार नाही, मी तुम्हाला फक्त शेंगदाणे खायला देणार. भिजवलेल्या शेंगदाण्यामध्ये सर्व काही असतं, असं मला ईशायोगामध्ये सांगण्यात आलं आहे,’ तर मात्र हे लागू पडणार नाही. तुम्ही हे पाहिलं पाहिजे की, तुमची योग साधना त्याच्या कामी येत आहे आणि तो ज्याला ओळखायचा त्याहून कितीतरी अद्भुत व्यक्ती तुम्ही आज बनला आहात. मग तो खात्रीने तुम्ही तुमच्या सकाळच्या क्रि या करत आहात का याकडे लक्ष देईल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं कल्याण साधलं जात आहे, पण अशीही काही कुटुंबे आहेत, जिथे कुणी १५ मिनिटे जरी ध्यान करत असेल, तर येतील आणि त्यांना हलवत म्हणतील, ‘तू डोळे बंद करून का बसला आहेस?’ तुम्ही जर अशा परिस्थितीत सापडला असाल, जिथे प्रत्येक नवीन गोष्टीला विरोध होत आहे, जिथे सर्वांना प्रत्येक लहान-सहान गोष्टींबद्दल असुरक्षितता वाटते; मग तुम्हाला कुटुंब आहे, असं मला वाटत नाही. क्षमा करा, मी फार निर्दयी आहे, पण याचा सामना करू या. कुटुंब म्हणजे २ किंवा ४ लोक, जे एकमेकांच्या कल्याणासाठी झटत आहेत. त्यांना एकमेकांविषयी आस्था आहे. पण जर तिथं काहीच काळजी नसेल, तर मग तुम्हाला खरंच कुटुंब नाही. या गोष्टीकडे डोळसपणे बघण्याची हीच वेळ आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक