शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

हे मन कैसे केवढे ।  ऐसे पाहो म्हणो मी तरी न सापडे ।।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 18:24 IST

बोधवाणी

मनुष्य शरीरामध्ये सर्व गोष्टी दाखविता येतात. सर्व इंद्रिये ही कुठे आहेत हे सांगता येतात परंतु मन नावाचे इंद्रिय कुठे आहे? कसे आहे? केवढे आहे? हे सांगता येत नाही. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात...हे मन कैसे केवढे । ऐसे पाहो म्हणो मी तरी न सापडे ।।एरव्ही राहाटावया थोडे । त्रैलोक्य राया ।।हे मन कुठे व कसे आहे हे सांगता येत नाही पण या मनाला फिरायला जायला संपूर्ण त्रैलोक्यही कमी पडेल असे हे मन आहे हे मात्र खरे असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. संत तुकाराम महाराज तर म्हणतात...बहुत चंचल चपळ ।जाता येता न लगे वेळ ।।हे मन चंचल व चपळ असे आहे. एखादी गोष्ट ताबडतोब पूर्ण करणे याला चपळ म्हणतात व एखादी गोष्ट अर्धवट सोडून जाणे याला चंचल म्हणतात. मनाने जर ठरविले तर कोणतेही काम ताबडतोब पूर्ण होईल,म्हणून मन चपळ आहे.मनाने जर सहकार्य नाही केले तर सर्व कामे अर्धवट राहतील म्हणून हे मन चंचलही आहे फक्त गंमत अशी आहे की, बºयाच वेळेस हे मन संसारात गेले की चपळ असते. परमार्थात आले की चंचल होते असे हे मन चंचल व चपळ स्वरुपाचे आहे.या मनाचा चंचल स्वभाव सांगताना अनेक ठिकाणी माकडांचा दृष्टांत दिला जातो. मर्कटस्य सुरापानं तश्च वृश्चिक दंशनम ।तन्मध्ये भूत संचारो यदा तदा भविष्यती ।।मुळातच माकड ते चंचल असणारच. त्याच माकडाला विंचू चावला, त्यामध्येच मद्यप्राशन केले, त्याच माकडाला भूतबाधा झाली तर ते माकड जेवढे चंचल तेवढे मन चंचल आहे. असे शासन सांगते. संत ज्ञानेश्वर महाराज तर सांगतात की, हे मन असे विचित्र आहे की,जे बुद्धीते सळी । निश्चयाते टाळी ।धैर्याशी हातफळी । मिळवूनि जाय ।।जे विवेकाते भुलवी  ।संतोषासी चाड लावी ।बैसिजेतरी हिंडती । दाहीदिशा ।।हे मन बुद्धीला निश्चयापासून बाजूला करते. धैर्याचे खच्चीकरण करते. विवेकाला नष्ट करते, मनुष्य जीवनामध्ये समाधान राहू देत नाही. एका ठिकाणी बसवून दाहीदिशांना फिरविणारे असे हे विचित्र मन आहे.

सामान्य माणूस हा या मनाचा दास असतो व हे मन मात्र संताचे दास झालेले असते. या मनावरही मालकीपणा येतोे तो फक्त संत तत्त्वाचा ! याचे कारण या मनाचा संपूर्ण परिवार हा या संताचा दास झालेला आहे. मग प्रश्न पडतो की, या मनाचा विस्तार काय? या मनाचा परिवार म्हणजे काय? याचा विचार पुढे करू. 

-ह.भ.प. जयवंत महाराज बोधलेधामणगावकर, पंढरपूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारी