संतांनी आम्हाला दाखविलेला प्रत्येक मार्ग हा तेजाचा मार्ग आहे आणि तो खूप सखोल व स्वच्छ आहे. या तेजस्वी मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रत्येक जीवाच्या जीवनात तेजच येते. या तेजाचा विचार करता त्यांनी आम्हाला,‘सहज बोलणे हित उपदेश।करुनि सायास शिकविती।।’या न्यायाने आमच्या जीवनातील कितीतरी समस्यांवरची उत्तरे दिलीत किंवा उपाय सुचविलेत.संतांनी असेच जे अनंत उपाय आम्हाला सांगितले आहेत. त्यातीलच ईश्वराच्या प्राप्तीचा एक खूप देखणा व आम्हाला सर्वांगाने अंतर्मुख करणारा उपाय सांगताना आमचे तुकाराम महाराज सांगतात,‘भावे गावे गीत।शुद्ध करोनिया चित्त।।तुज व्हावा आहे देव।तरी हा सुलभ उपाव।।’जर आम्हाला ईश्वरी अनुभूती घ्यायची आहे तर आम्हाला त्याचं गुणगान भावयुक्त अंत:करणाने करावं लागेल. मुळातच जगातील सगळ्या संतांनी साधनामार्गांचं मुख्य अधिष्ठान भाव हेच सांगितलं आहे. भावविरहित बुद्धीने परमार्थ साधू शकत नाही हे सांगताना आमचे ज्ञानोबाराय म्हणतात,‘भावबळे आकळे एरव्ही नाकळे।करतळी आवळे तैसा हरी।।’पारमार्थिक अनुभूती घेण्यासाठी बाकी कोणतं बळ आमच्या अंगी असो अथवा नसो, पण भावाचं बळमात्र आमच्या अंगी असायलाच हवं. एक भाविकसामर्थ्य आमच्या अंगी असेल, तर आम्हाला आमचं साधकीय जीवन अगदी सुदृढपणाने जगता येऊशकतं. म्हणून आमच्या ठायी भाव असलाच पाहिजे आणि तोही बळकट व दृढ तसेच निष्ठाधिष्ठित भाव असलापाहिजे.
संतमार्ग हा तेजाचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 18:20 IST
जर आम्हाला ईश्वरी अनुभूती घ्यायची आहे तर आम्हाला त्याचं गुणगान भावयुक्त अंत:करणाने करावं लागेल. मुळातच जगातील सगळ्या संतांनी साधनामार्गांचं मुख्य अधिष्ठान भाव हेच सांगितलं आहे. भावविरहित बुद्धीने परमार्थ साधू शकत नाही हे सांगताना आमचे ज्ञानोबाराय म्हणतात,
संतमार्ग हा तेजाचा मार्ग
ठळक मुद्दे म्हणून आमच्या ठायी भाव असलाच पाहिजे आणि तोही बळकट व दृढ तसेच निष्ठाधिष्ठित भाव असला पाहिजे.