शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

प्राणशक्तीतून आरोग्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 05:48 IST

आज जरी अनेक जण वैद्यकीयदृष्ट्या निरोगी असले तरी ते आंतरिक स्वास्थ्य अनुभवत नाहीत.

- सद्गुरू जग्गी वासुदेवआज जरी अनेक जण वैद्यकीयदृष्ट्या निरोगी असले तरी ते आंतरिक स्वास्थ्य अनुभवत नाहीत. संपूर्ण स्वास्थ्य अनुभवण्यासाठी शरीर, मन आणि जीवनऊर्जा यांच्यात एका विशिष्ट पातळीवर समन्वय व तीव्र आंतरिक सक्रियता हवी. बहुतेकांच्या बाबतीत हे घडत नाहीये कारण जीवनऊर्जा प्रणाली स्वास्थ्यावर त्यांचे नियंत्रणच नाही. योगाच्या संदर्भात आपण जेव्हा आरोग्याविषयी बोलतो तेव्हा आपण शरीर किंवा मन यांच्याकडे बघत नाही, तर जीवनऊर्जेवर लक्ष देतो. जर तुमची जीवनऊर्जा प्रणाली; म्हणजेच तुमचा प्राणमयकोष संतुलित आणि पूर्णत: सक्रिय असेल तर तुमचे शरीर आणि मन पूर्णपणे स्वस्थ राहील. म्हणून एक अशी मूलभूत योग साधना निर्माण करणे फार महत्त्वाचे आहे जेणेकरून तुमची जीवनऊर्जा सक्रिय होईल आणि मग तुमचे शरीर व मन स्वाभाविकपणे स्वस्थ आणि निरोगी असेल. संक्रमित रोग आणि जुनाट आजार यामध्ये फरक आहे. इन्फेक्शन आपण औषध घेऊन बरे करू शकतो, तर जुनाट विकारांचे मूळ हे जीवनऊर्जेत असते. जर लोक थोडीफार साधना करायला तयार असतील तर जीवनऊर्जा किंवा प्राणमयकोष संतुलित आणि सक्रिय करून जुनाट विकारांपासून नक्कीच स्वत:ची सुटका करून घेऊ शकतात. आपण कोणत्या प्रकारचे अन्न खातो, पाणी पितो, हवा आपल्या शरीरात घेतो याचा अनेक प्रकारे परिणाम होतोच. पण जीवनऊर्जेची जर योग्यरीत्या निगा राखली गेली असेल तर या गोष्टींचा फारसा प्रभाव पडत नाही. आज वैद्यकशास्त्र फक्त भौतिक शरीरापुरतंच सीमित आहे. त्यापलीकडे काही घडलं तर त्याला तुम्ही चमत्कार म्हणता. मी त्याला विज्ञानाचाच एक पैलू म्हणतो. तुमच्या जीवनऊर्जेनेच तुमचं संपूर्ण शरीर घडवलंय. तर तीच जीवनऊर्जा शरीराची दुरुस्ती करू शकत नाही काय? जर तुमची ऊर्जा पूर्ण जोमात आणि संतुलित असेल तर केवळ आरोग्यच नव्हे तर इतर खूप काही करण्याची क्षमता त्या ऊर्जेत आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक