शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग: दुष्टांचा संहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 04:00 IST

एक अतिरेकी मारणं पापच. पण अनेक निरपराधी वाचवणं हा त्या पापाचा शुद्ध हेतू आहे. इथे हिंसाच अहिंसा होऊन जाते. सतत मार खाणारी अहिंसा अनेकांच्या हिंसेला कारणीभूत होत असेल तर ते पुण्य पापात्मक आहे.

बा.भो. शास्त्री

एक अतिरेकी मारणं पापच. पण अनेक निरपराधी वाचवणं हा त्या पापाचा शुद्ध हेतू आहे. इथे हिंसाच अहिंसा होऊन जाते. सतत मार खाणारी अहिंसा अनेकांच्या हिंसेला कारणीभूत होत असेल तर ते पुण्य पापात्मक आहे. अंगलट येणारी दया पृथ्वीराज चौहान या पराक्रमी राजाला भोवली. फसवा घोरी जिंकला. क्षमा हरली. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात,‘‘दया तिचे नाव धर्माचे पालनआणिक निर्दालन कंटकाचे’’किती सुंदर अभंग आहे हा. धर्माचे पालन दयाच करते व दुष्टांचा संहार हेही दयेतच येतं. अभ्यासासाठी मुलांना निवेदन देऊन काय उपयोग? त्यांच्यावर रागावणं गरजेचं आहे. बेसुमार मोबाइलचा वापर करणारी मुलं आणि मुली अनिष्टाच्या भोवऱ्यात सापडत असतील तर त्याला आपणच जबाबदार असतो. यांचं भान आपल्याला असावं लागतं. तेव्हा त्यांना समज द्या. काही ऐकतील, काही ऐकणार नाहीत. न ऐकणारे तुम्हाला सोडायला तयार आहेत, मोबाइल नाही. संसार सोडणाऱ्या संन्याशाच्या कानाला तो चिकटला आहे. कसं करणार? तो कसा वापरायचा तुम्ही सांगालही. पण तसं करीलच याचा भरोसाच नाही. रेडिओ कानातून घुसला. हा डोळ्यातून शिरला. चांगलं माहितीचं प्रलोभन दाखवून. हा वाईट जास्त शिकवतो. त्यात धर्म आहे. अधर्म आहे. कीर्तन आहे. नर्तन आहे. राम आहे. काम आहे. अशा चक्रव्यूहात अभिमन्यू व सभेत द्रौपदी आहे. मोबाइलला दया येत नाही. चांगलं स्वीकारणाऱ्यांची संख्या कमी तर वाईट घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आम्ही पांडवांसारख्या माना खाली घालतो. त्यांना वाचवण्यासाठी हुशारीने इष्टकारक अनिष्ट करायला काय हरकत आहे?

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक