शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

आनंदाचा कल्पतरू जगभर शोधूनही सापडणार नाही; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 17:17 IST

माणसाची कामधेनूसारखी आणखी एक वेडी कल्पना आहे. कल्पतरू! असं एक झाड की ज्याच्याखाली बसलं नि मनात कोणतीही कल्पना केली की ती पुरी होते.

- रमेश सप्रे 

माणसाची कामधेनूसारखी आणखी एक वेडी कल्पना आहे. कल्पतरू! असं एक झाड की ज्याच्याखाली बसलं नि मनात कोणतीही कल्पना केली की ती पुरी होते. अशा झाडाच्या कल्पवृक्षाच्या शोधात जगभर नि जीवनभर जरी फिरलो तरी त्याचा शोध लागलाच नाही. कसा लागणार कारण असा कल्पवृक्ष बाहेर नाहीच तर आपल्या आतच आहे. 

‘सकारात्मक विचारसरणी’ नि त्यानुसार जीवनसरणी म्हणजे राहणी-करणी-वाणी हाच तो कल्पवृक्ष. पण अशी जीवनशैली किती जणांची असते?

या संदर्भात एक मार्मिक गोष्ट आहे. मनोरंजक असल्याने ती अनेकदा सांगितली, ऐकली जाते; पण म्हणतात ना पालथ्या घडय़ावर पाणी. तसं होतं आपलं. कळतं पण वळत नाही. म्हणून ते जीवनात फळत नाही. हा सर्वाचा अनुभव आहे. 

एकदा एक व्यापारी दुस-या गावाहून आपल्या गावाकडे येताना वाटेतल्या रानात वाट चुकला. अंधारात काही दिसत नव्हतं. रात्र कुठं तरी सुरक्षित काढावी नि उद्या उजडल्यावर पुढं जावं या विचारानं झुडूपांच्यामध्ये असलेल्या एका झाडाखाली तो बसला. जरा वेळानं त्याच्या मनात कल्पनाचक्र गरगरू लागलं. 

आता घरी असतो तर गरम गरम जेवण मिळालं असतं. ही कल्पना मनात उठताच जमिनीतून एक ताट वरती आलं. अनेक सुग्रास पदार्थानी भरलेलं. मागचा पुढचा विचार न करता त्या भुकेल्या प्रवाशानं सारं चाटून पुसून खाल्लं. आता थंडगार पाणी मिळालं तर असा विचार मनात येतो न येतो तोच जमिनीतून एक सुगंधीशील जल भरलेला लोटा वर आला. गटागटा पाणी प्यायल्यावर साहजिकच झोपेचा विचार मनात येताच एक मऊ मऊ गादी पांघरूणासकट जमिनीतून वर आली. तिच्यावर पडल्यावर अंग दिवसभरच्या श्रमानं नि भटकण्यानं दुखत असल्याची जाणीव झाली. घरी असतो तर कुणाकडून तरी अंग चोपून घेतलं असतं ही कल्पना मनात उठते ना उठते तोच एक सुंदर स्त्री हातात पंखा घेऊन जमिनीतून वर आली नि तिनं त्याचे पाय चेपण्यास सुरुवात केली. काहीवेळा त्याला स्वर्गीय सुखाचा अनुभव आला; पण लगेच त्याच्या मनात कल्पना आली, अरे, मनात विचार करू ते सारे मिळतंय, म्हणजे इथं भुताटकी वगैरे तर नाही. एखादं भूत आलं नि आपल्याला खाऊन टाकलं तर?’ आणि अशी कल्पना येते न येते तोच एक भूत आलं नि त्याला त्या भुतानं खाऊनही टाकलं.

तो ज्या झाडाखाली झोपला होता,आस:यासाठी थांबला होता ते झाड होतं ‘कल्पवृक्ष’. मनात कल्पना आली की लगेच ती सत्यात घडते किंवा पुरवली जाते असा कल्पतरू. तो समजा असेल तर कुणाच्या दाराबाहेर? अर्थातच एक तर ज्यांच्या सर्व कल्पना शांत झाल्या आहेत. ज्यांना कल्पनेच्या पलिकडे (कल्पनातीत) असलेल्या सत्याचा अनुभव आलाय अशांच्या दारात. घराच्या मागच्या परसात असा कल्पवृक्ष असतो असंही नाही. ते ज्या झाडाखाली बसतात ते झाडच बनतं कल्पवृक्ष!

त्यांच्या मनात सतत सकारात्मक कल्पना असतात, जगाच्या कल्याणासाठी विधायक कल्पना असतात, नवसर्जनाच्या म्हणजे नवनिर्मितीच्या कल्पना असतात. त्या पु-या करण्यासाठी सारी सृष्टी-समष्टी (निसर्ग नि समाज) त्यांना अनुकूल होतात. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। देह कष्टवीती उपकारे’ यात महत्त्वाचा भाग अशा कल्पवृक्षाखाली बसण्याचाच असतो. ज्ञानोबा माउली यालाच म्हणते 

‘चला कल्पतरुंचे आरव’.

म्हणजे संत म्हणजे चालते बोलते कल्पतरू! नुसते कल्पतरू नव्हेत तर कल्पवृक्षांच्या बागा. असे ते संत कल्पतरू आपल्याकडे आपणहून येतात ते आपल्या कल्पना पु-या करायला नव्हे, तर कल्पना जर स्वार्थी, संकुचित असतील तर त्या दूर करून त्याऐवजी ‘भूतां परस्परे जडो मैत्र जिवांचे’ अशी सर्व प्राणीमात्राशी स्नेहसंबंध जोडण्याची जीवनशैली शिकवायला येतात. काही लोकांच्या तर सा-या कल्पना संपवून त्यांना निर्विकल्प समाधीचा अनुभव देतात. 

समर्थ रामदासांचा अशा पोकळ नकारात्मक कल्पनांना मोठा आक्षेप आहे ते म्हणतात, 

‘मना, कल्पना कल्पिता कल्पकोटी।

नव्हे रे, नव्हे सर्वथा रामभेटी।।

सच्चिदानंद परमेश्वराचा अनुभव हा सत्य, प्रत्यक्ष असतो. काल्पनिक नसतो. स्वप्नातला दृष्टांत अन् प्रत्यक्ष परमेश्वराचा स्पर्श, अनुभूती या दोन निराळ्या गोष्टी आहेत. 

दोन शब्द आहेत. काल्पनिकता नि कल्पकता. काल्पनिकतेतून कदाचित काव्य, एखादी कलाकृती जन्माला येईल; पण कल्पकतेतून विज्ञानातले शोध लागतात. निसर्गातली रहस्यं उलगडली जातात. मुख्य म्हणजे स्वत:च्या व इतरांच्या जीवनात आनंद भरून टाकता येतो. 

कल्पनेतून निर्माण होते नवनिर्मितीची प्रतिभा (क्रिएटिव्हिटी) आनंदाला भारक, कल्पनेचा उगम असतो जीवनाच्या अनिश्चितेत, अनियमिततेत, अनपेक्षितपणे घडणा-या घटनांत. यासाठी जीवन घडवणा-या, जीवनाला तारक अशा कल्पवृक्षाचा शोध बाहेर न घेता आतच घेऊ या. कारण तो आपल्या चांगल्या कल्पनांना आशीर्वाद देणारा आनंदाचा कल्पवृक्ष आतच आहे. पु. गोंदवलेकर महाराज हेच सांगतात

परेपासूनि (नाभीपासून) उठे श्वास। तो उभा कल्पवृक्ष।

त्याची अमृतफळे सुरस। श्रीरामा अर्पिली।।

याच्याच जोडीनं त्यांचं असंही सांगणं असे की अखंड आनंदात राहायचंय ना? मग नाम जपा. श्वासोच्छश्वास श्वासाश्वासावर नाम घेऊन ईश्वर स्मरण ठेवून जगलं तर कल्पवृक्षाच्या छायेत निरंतर आनंद लाभेल. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक