शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

गुरु गुरु परमात्मा परेषू...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 19:22 IST

मानवी स्वभावाच्या विविध पैलूंना, सवयींना घासून पुसून चमकविण्याचे कार्य एक शिक्षकच करू शकतो.

मानवी जीवनाला आकार देणारा खरा कुंभार जर कोणी असेल तर तो माणसाला लाभलेला गुरु होय. मानवी स्वभावाच्या विविध पैलूंना, सवयींना घासून पुसून चमकविण्याचे कार्य एक शिक्षकच करू शकतो. त्यामध्ये सर्वात पहिली भूमिका आईची गुरु म्हणून महनीय आहे.आई माझा गुरु। आई कल्पतरु।।सुखाचा सागरू ।आई माझी।।भारतीय संस्कृती व विचार परंपरा यामध्ये असणारी विचारधारा गुरू परंपरेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. संदीपनी - श्रीकृष्ण, वसिष्ठ- श्रीराम, द्रोणाचार्य -अर्जुन या प्राचीन कालखंडातील काही गुरु-शिष्यांच्या जोड्या अजरामर झालेल्या आहेत. प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून गुरूंच्या शेताचा बांध वाचवणारा आरुणी शिष्याची निष्ठा अधोरेखित करतो तर गुरूने मांगीतलेला अंगठा एकलव्य एक क्षणात देतो. ही महाभारतातील त्यागाची घटना सर्वश्रुत आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये निवृत्तीनाथ- ज्ञानेश्वर, रामकृष्ण परमहंस - स्वामी विवेकानंद, संत तुकाराम- छत्रपती शिवाजी महाराज हे अतिशय जगप्रसिद्ध गुरु-शिष्यांच्या जोड्या आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने व विचारधारेच्या बळावर त्यांच्या शिष्याच्या जीवनामध्ये कायापालट झालेला आहे. अलीकडच्या काळात रमाकांत आचरेकर व सचिन तेंडुलकर या गुरू शिष्याच्या जोडीने सर्व जगाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले होते. आपल्या शिष्याने जगामध्ये नाव उज्वल करावे हा ध्यास प्रत्येक गुरूचा असतो. गुरु म्हणजे कोण? तर शिष्या मधील असणाऱ्या गुणांना ओळखून त्या गुणांना खऱ्या अर्थाने पारखून त्याना जगासमोर मांडण्याचे कसब ज्या व्यक्तीमध्ये असते तो म्हणजे खरा गुरु होय. गुरूच्या आगमनाने शिष्याच्या जीवनातील दहाही दिशा प्रकाशमान होतात. त्याला त्याच्या आयुष्यातील सर्व अंधकार गुरूच्या ज्ञानाच्या प्रकाशाने दूर करता येऊ शकतो. ज्ञानेश्वर माऊली गुरूंचे वर्णन करताना ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात- म्हणुनी जाणतेनो श्रीगुरु भजीजे। जेणे कृत कार्य होइजे। जैसे मूळ सिंचने सहजे ।शाखा पल्लव संतोषती।।ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाच्या मुळाशी आपण जलसिंचन केले असता त्याचा फायदा त्यांच्या शाखा व पानांना होतो; त्याप्रमाणे सामान्य माणसाने श्रीगुरुयांच्या विचाराने व ज्ञानाने आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. हा संदेश देतात. वेदकाळापासून गुरुमहिमा अपरंपार आहे म्हणूनच वेदांमध्येगुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा । गुरु साक्षात परब्रम्ह तस्मये श्री गुरवे नमः ।।असे म्हटले आहे. आयुष्यातील पहिला श्री गणेशा आईच्या शिकविन्याने होतो तर पुढे वर्गात शिकवणारे गुरु शिक्षक हे सुद्धा विविध टप्प्यावर गुरुची भूमिका निभावत असतात. विज्ञान युगामध्ये हे आज संगणक आपल्याला विविध प्रकारे माहिती प्राप्त करून देतो तर त्याला गुरु म्हणावे का तर जो ज्ञान देतो, मार्ग दाखवितो व चुकलेल्याला वाट दाखवतो तोच खरा गुरु होय. मानवी मनाची शक्ती अगाध आहे. ती शक्ती प्रत्येकच व्यक्तीला ओळखता येत नाही. ती शक्ती ओळखण्याचे काम गुरु करत असतो, त्या शक्तीला त्या व्यक्तीची ताकद बनवायची काम गुरु करीत असतात . खऱ्या गुरूंना ओळखता आले पाहिजे. भारतीय अध्यात्म विचारांमध्ये हे आपण जर पाहिलं तर नामदेवांनी आपल्या आयुष्यात गुरु केले नव्हते म्हणून छोट्याशा मुक्ताईने त्यांना गोरोबा काकांच्या थापट्या ने तपासून नामा कच्चा हा निकाल दिला होता .त्याचं कारण त्यांच्या आयुष्यात गुरूंचे स्थान नव्हतं. गुरु नसल्यामुळे अहंकार आला होता साक्षात भगवंत माझा हातचे जेवण जेवतो . म्हणजेच नाम्याच्या हातची खीर भगवंत खात होते त्यामुळे त्यांना अभिमान झाला होता, तो जाण्यासाठी गुरूंना शरण गेले पाहिजे हा उपदेश संत मंडळींनी नामदेवांना केला होता. त्यामुळे त्यांनी थेट विसोबा खेचर यांचे कडे जाऊन त्यांना आपले गुरु केले होते. श्री गुरु सारखा असता पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी ।।राजयाची कांता काय भीक मागे। मनाच्या जोगे सिद्धी पावे ।।असं वर्णन ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये श्रीगुरुंबद्दल केले आहे. आज आपल्याला प्रत्येकालाच योग्य गुरु प्राप्त होईलच हे सांगता येणार नाही. म्हणून ग्रंथांना आपले गुरु मानले तर ते आपल्याला निश्चितपणे योग्य वाट दाखवू शकतात. त्यांच्यामध्ये असणारी ज्ञानाची शक्ती आपले आयुष्य उजळून टाकू शकते.म्हणून प्रत्येकाने ग्रंथांना गुरुस्थानी मानून अध्ययन करण्याची आवश्यकता आहे. आज वाचन संस्कृती लोप पावत असून, ग्रंथांना गुरु मानण्याची आपली जी परंपरा आहे ती बाजूला करून संगणकावर असलेल्या माहिती आपली गरज भागवत आहे. त्यामुळे जे मला माहित आहे ते इतरांना माहीत आहे. जे इतरांना माहीत आहे ते मला माहित आहे . त्यामुळे सर्वांचे ज्ञान एका विशिष्ट पातळीवर समान झाले आहे. ग्रंथामुळे ज्ञानाची लांबी, रुंदी, खोली व कल्पकता ही वाढण्याचे एक महत्वाचे साधन आहे. जणूकाही एखादी व्यक्ती जी मार्गदर्शकाच्या भुमीकेत आहे ती आपल्याला मार्ग दाखवीत आहे, त्याप्रमाणे ग्रंथसुद्धा आपल्याला विविध प्रसंगी मार्ग दाखवत असतात. अनुभव हा सुद्धा एक महत्त्वाचा शिक्षक किंवा गुरूच आहे. अनुभव आपल्याला त्याच्या बळावर विविध निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरत असतो. ज्याचा अनुभव जेवढा अधिक तेवढा त्याचा निर्णय अधिक अचूक असतो हे बऱ्याच प्रमाणात सत्य आहे. अनुभवी व्यक्ती हे कुटुंबाचे,संस्थेचे व राष्ट्राचे खरे धन आहेत. खरे गुरु आहेत. त्यांच्या अनुभवाच्या ज्ञानाने त्या व्यक्तींना त्या संस्थेला त्या राष्ट्राला पुढे नेण्याची, भवितव्य घडवण्याची व निश्चित क्षमता असते म्हणून अशा व्यक्तींना जपणे ही प्रत्येक कुटुंबाची , संस्थेची व राष्ट्राची महत्त्वाची जबाबदारी आहे. गुरू काय करू शकत नाही- वो चहा तो इंसान बना सकता है ।ऐसे वैसे को सुलतान बता सकता है ।उसकी शक्ती को समझो दुनियावालो । वो पत्थर की मुरत को भगवान बना सकता है । वो है गुरू... अनुभव हा कठोर शिक्षक आहे तो पहिल्यांदा शिक्षा करतो व त्यानंतर शिकवितो. ओपन असणारा गुरु आज प्राचीन कालखंडांमध्ये राज कुमारांना गुरूंच्या आश्रमात जाऊन शिक्षण घ्यावे लागत होते. तेव्हा त्यांना आपल्या राजघराण्यातील सुख सुविधा त्यागून हे काम करावे लागत होते. सांदिपनी ऋषींच्या आश्रमात साक्षात श्रीकृष्ण भगवंतांनी फुले फळ तोडणे, लाकडे तोडणे, गुरूंच्या सोबत जे पडेल ते काम करणे व त्यांचे आज्ञापालन करणे असे काम केले आहे. म्हणजेच श्रमाचे मूल्य गुरु शिष्यांना शिकवित होते. त्या बळावर त्यांनी आपले आयुष्य उजळून टाकले. रामकृष्ण व स्वामी विवेकानंद यांची ही जोडी तत्वज्ञान विषयक चर्चांमध्ये अजरामर झालेली आहे. महात्मा फुले संत कबीर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुरू स्थानी मानत असत. तुकडोजी महाराजांचे गुरू संत अडकोजी महाराज हेसुद्धा अलीकडच्या काळातील एक महत्वाची गुरु-शिष्य परंपरा व त्यांचा संप्रदाय जयगुरुदेव परंपरेचे आचरण करीत आहेत.गुरूदेव दया करदे । हम ध्यान धरे तेरा ।।हा विचार राष्ट्रसंतांनी या गुरु परंपरेसाठी दिला आहे ..आज धर्म, अध्यात्म व विज्ञान यांनी कितीही प्रगती केली असली तरी अंतरीच्या जिव्हाळा पासून शिकविणाऱ्या शिक्षकांची, गुरूंची वानवा आहे. गुरूंची जागा कोणताही संगणक घेऊ शकणार नाही .करण त्याला बनविणारा हा शेवटी एक गुरूच आहे,एक व्यक्तीच आहे. म्हणून गुरुचे मानवी जीवनातील तील स्थान हे एकमेवाद्वितीय व अनन्यसाधारण आहे ते बदलता येऊ शकत नाही...

- डॉ. आखरे हरिदास

टॅग्स :Akolaअकोलाspiritualअध्यात्मिकGuru Purnimaगुरु पौर्णिमा