शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मोहमाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 03:10 IST

- विजयराज बोधनकर संपूर्ण जग हे आनंदाने भरलंय, तरीही घराघरात दु:खाचे डोंगर उभे आहेतच. स्व:बळावर नाव, धन, आरोग्य मिळविता येत ...

- विजयराज बोधनकरसंपूर्ण जग हे आनंदाने भरलंय, तरीही घराघरात दु:खाचे डोंगर उभे आहेतच. स्व:बळावर नाव, धन, आरोग्य मिळविता येत असूनही अनेक माणसे भ्रष्टाचार करताहेत. ही पंचमहाभुते अनंत काळापासून मानवाचे नि:स्वार्थपणे पालनपोषण करताहेत तरी ही मानवाला त्याची किंमत का कळत नाही? सकाळचा सूर्योदय आनंद देतो. कशाचीही मागणी न करता पाऊस, वर्षा आणि शरद ऋतू हजेरी लावतो. भाद्रपद, अश्विन, कार्तिक महिन्यात निसर्ग हिरवागार होऊन मानवी डोळ्याला, मनाला न मोजता येणारा आनंद देऊन जातो. पुढे हेमंत शिशिर आणि वसंतऋतू आल्हाददायक हिवाळा प्रत्येक जीवाला आनंद देऊन जातो.जगण्यासाठी अन्न, राहण्यासाठी घर, देहासाठी वस्त्र इतक्याच खऱ्या मानवी गरजा. तरीही अधाशासारखा तो का मोहमायेच्या मागे मागे पळतोय आणि इतकं मिळवूनही शेवटी दु:खाच्या अप्रिय गोष्टी मनात ठेवून प्राण सोडतो. प्रिय आणि अप्रिय मानवी गुण संस्काराच्या वृत्तीतूनच जन्म घेत राहतात. परमेश्वर हा गमितानतेत दडला आहे. सत्य, शिव, सुंदर याची व्याख्या ज्याच्या लक्षात आली तो समाधानातले सुख काय असते ते अनुभवू शकतो. झाडावर फुललेले फूल जगण्याचे खरे तत्त्वज्ञान सांगू शकते. त्यातला उल्हासित सुगंध, रंग, लोभस आकार यातूनच नि:शब्दपणे कसे जगावे याचे उत्तर मिळत जाते.मानवी देहातले न दिसणारे मन जर फुललेल्या फुलासारखे बनत गेले तर त्या माणसाला सर्वत्र आनंद दिसायला लागेल. निसर्गशक्तीने निर्माण केलेल्या प्रत्येक बिजात त्याचं मूळ सुंदर रूप दडलं असतं. मनोबीजातून निर्माण झाल्या विचारफुलांची माळ निर्माण करायची की फक्त निर्माल्य बनू द्यायचं हे सर्वस्वी त्या त्या माणसाच्या हाती असतं. आनंदाची दालने सर्वत्र उघडी आहेत तिथे आपलं मन कुठलं पाऊल उचलतंय यावरती सर्व अवलंबून आहे. शेवटी प्रत्येक माणूस आपल्या सुखदु:खाचा शिल्पकार असतो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक