शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विराट पुरुष रामा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 05:25 IST

श्रीरामाला तुम्ही श्रीविष्णूचे अवतार आहात, याची जाणीव केली. त्याआधीही परशुरामाने रामाचे अवतारित्व घोषित केले होतेच! रावणवधासाठी मनुष्यदेह धारण केला होता.

वाल्मीकी रामायणात लिहिले आहे, सीतेने जेव्हा अग्निप्रवेश केला, तेव्हा भगवान शंकर, ब्रह्मदेव, देवेंद्र, यम वगैरे सगळे देव विमानातून एकत्रच लंकेत श्रीरामाजवळ उपस्थित झाले. त्यांना पाहून हात जोडून उभ्या असलेल्या रामाला ते सूरश्रेष्ठ म्हणाले,‘तूच कर्ता या विश्वाचा, ज्ञाता, श्रेष्ठ विभू,अग्निदिव्याची सीतेच्या, का अपेक्षा प्रभू?का उपेक्षसी वैदेहीला, प्राकृत मनुष्यासम?का न जाणसी स्वत:स अजूनी,तूच पुरुषोत्तम’तेव्हा श्रीराम त्यांना म्हणाले,‘मानतो मी स्वत:स माणूस, दशरथपुत्र राम,देवा सांगा तथापि मजला वस्तुत:मी कोण?’श्रीरामाने असे विचारल्यावर ब्रह्मदेव त्याला म्हणाले, ‘श्रीनारायण, चक्रायुध प्रभू,तूच असशी रामा’,तूच वराह, काल शत्रूचा जेता, तूच रामा’तूच अक्षरब्रह्म सत्य, सर्व काली, रामा,परमधर्म लोकांचा, चतुर्भुज, विष्णू तू रामा’हृषिकेश तू अजित पुरुष, पुरुषोत्तम रामा,खड्गधारी, महाबलशाली, कृष्ण तूच रामा’बुद्धी सत्य, क्षमा निग्रह, सृष्टी तूच रामा,प्रलयाचे कारण तू, उपेंद्र, तूच रामा’परमात्मा तू हृदयामधला,विराट पुरुष रामा,अस्तित्व ना जगा तुज्याविण,विश्वच तू रामा’सीता साक्षात असे लक्ष्मी,विष्णू तूच रामा,दिव्यरूपधारी परमात्मा, असे तूच रामा’श्रीरामाला तुम्ही श्रीविष्णूचे अवतार आहात, याची जाणीव केली. त्याआधीही परशुरामाने रामाचे अवतारित्व घोषित केले होतेच! रावणवधासाठी मनुष्यदेह धारण केला होता. राम, आत्माराम, त्याला त्रिवार वंदन...!