शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चराचरी हरी गुरुमुखे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 04:44 IST

गुरू म्हणजे कोण... तर निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू.

- शैलजा शेवडेगुरू म्हणजे कोण... तर निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. इतर प्रापंचिक गोष्टी शिकविणारे अनेक असतात, पण जे ब्रह्म तत्त्वाची अनुभूती करून देतात, ते सद्गुरू...! त्यांनाच आपण ब्रह्म, विष्णू, महेश्वर म्हणतो... त्यांनाच साक्षात परब्रह्म असं म्हणतो. संत निवृत्तीनाथ त्यांच्या अभंगात म्हणतात,गुरू परब्रह्म, गुरू मात पिता ।गुरु विण दैवत नाही दुजे।निवृत्ती म्हणे मज गुरू बोध दिठी ।भक्ती नाम पेटी उघडली ।आज निवृत्ती नाथांचे अभंग वाचताना मन अक्षरश: थरारून गेले. ते म्हणतात,छेदियला वृक्ष, तुटले ते मूळ, प्रपंच समूळ उडोनी गेला,गेले ते सुमन, गेला फुलहेतू, अखंडित रतु, गोपाळी रया ।सांडिला आकारू, धरिला विकारु , सर्व हरीहरू एकरूपे ।निवृत्ती निधान वोळले गयनी,अमृताची धनी आम्हां भक्ता ।संसार वृक्ष मी समूळ तोडला, त्यामुळे संसार नावाच्या फुलातील विषय नावाचा भोग गेला. प्रपंचातील आकार विकार सर्व गेले. शिव, विष्णू एक आहेत हे कळले. गुरूंच्यामुळे ज्ञानामृताची प्राप्ती झाली.सर्वांघटी जो वसे, तो आम्हां प्रकाशे,प्रत्यक्ष आम्हां दिसे, गुरु कृपा ।सर्व शरीरात तो परमात्मा प्रकाशरूपाने, चैतन्यरूपाने राहत आहे, याची गुरूंच्यामुळे अनुभूती झाली ।पूर्णबोधे धाले, आत्माराम धाले, निखळ वोतले, पूर्णतत्त्वे, पूर्वपुण्य चोख, आम्हांसी सफळ, गयनि कल्लोळ तुषार आम्हां ।गुरूच्या कृपेने आम्हाला आत्मारामाचे दर्शन झाले. आमची पूर्वपुण्याई थोर, म्हणून आमच्यावर गुरूंनी नामामृताचे तुषार उडविले...!