शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - दु:खाचा स्वीकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 06:20 IST

मानवी कर्माचे जसे गणित आहे तसेच गणित मानवी विचारांचे आहे.

विजयराज बोधनकरसुखदु:खाचा खरा मेळ म्हणजेच खरं जीवन. दु:खाला डावलून आयुष्य पूर्णत्वाकडे जाऊच शकत नाही. फक्त सुखाचीच इच्छा मानवी मनात असेल तर ते अर्धसत्य असेल. रात्र काळी व दिवस प्रकाशमान हे जसे परिमाण आहे़ तसेच सुखानंतर दु:ख आणि दु:खानंतर सुखाचे गणित ठरलेले असते. जो नोकरीत खडतर कष्ट घेतो, सुखाच्या क्षणांचा त्याग करतो त्याच्या जीवनप्रवासात पुढे सुखाचा प्रकाश दिसतो. विद्यार्थी अवस्थेत जो सर्व सुखांचा त्याग करून फक्त अभ्यास आणि चिंतनात मनबुद्धी रमवितो त्याचे फळ त्याला परीक्षेतल्या उत्तम मार्कात किंवा यशात परावर्तीत झालेले आपण पाहतो. म्हणजेच त्याच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश येत राहतो.

मानवी कर्माचे जसे गणित आहे तसेच गणित मानवी विचारांचे आहे. दोन प्रकारचे विचार माणूस सतत करीत राहतो. एखादा विद्यार्थी मनातल्या मनात म्हणतो की मला निसर्गाने बुद्धीचे वरदान दिले आहे, त्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर परीक्षेत यश मिळविणारच. या निश्चयाने तो अभ्यासाच्या प्रक्रियेला लागतो आणि खरोखरच यश प्राप्त करून दाखवितो. परंतु एखादा विद्यार्थी निराशाजनक विचार करून मनातल्या मनात विचार करतो आणि स्वत:लाच सांगतो की हा अभ्यास माझ्या आवाक्याबाहेर असल्याने मला यश मिळविणे शक्य होणार नाही; आणि त्याचे पडसाद असे उमटतात की त्याच्या नकारार्थी विचारसरणीमुळे त्याच्या पदरी अपयशच पडते. म्हणजेच जसा संकल्प असतो तसेच फळ पदरी पडते. प्रथम त्यागाची भूमिका स्वीकारली की भोगाची सर्व लक्षणे गळून पडतात; आणि त्यानंतर सत्शील कृतीचे मार्ग आपल्यासाठी सहजरीत्या खुले होतात. म्हणजेच सुखदु:खाचा मेळ असल्याशिवाय किंवा स्वीकारल्याशिवाय खऱ्या जीवनाला प्रारंभच होऊ शकत नाही. तात्पर्य काय तर प्रथम दु:खाचा स्वीकार म्हणजेच सुखाला आकार प्राप्त करून घेणे होय़ 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक