शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कोमल वाणी दे रे रामा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 02:51 IST

काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचले होते की एका श्रीमंत व प्रतिष्ठित गृहस्थाच्या घरचा चौकीदार दोन दिवस कामावर आला नाही त्यामुळे सदर गृहस्थ त्याच्यावर खूप रागावले, चिडले, वाटेल तसे त्याला बोलले.

- प्रा. डॉ. संदीप ताटेवारकाही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचले होते की एका श्रीमंत व प्रतिष्ठित गृहस्थाच्या घरचा चौकीदार दोन दिवस कामावर आला नाही त्यामुळे सदर गृहस्थ त्याच्यावर खूप रागावले, चिडले, वाटेल तसे त्याला बोलले. चौकीदार बोलणे सहन करू शकला नाही व त्याने त्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. त्या गृहस्थाला अटक झाली व पुढे तुरुंगात रवानगी झाली. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात.कोमल वाणी दे रे रामा ।विमल करणी दे रे रामा ।।संत तुकाराम महाराज म्हणतात,बोलावे बरे । बोलावे खरे ।कोणाच्याही मनावर । पाडू नये चरे ।।म्हणजेच बोलताना शब्दाबाबत आपण अत्यंत जागरूक असणे आवश्यक असते. बरेचदा जीवनात घटना खूप क्षुल्लक असतात, पण आपण त्याला धारधार शब्दांनी चिघळून टाकतो. शब्दाला धार नसावी तर शब्द हे आधार देणारे असावेत कारण धारधार शब्द मन कापतात तर आधार देणारे शब्द मन जोडतात. जेव्हा आपण धारधार शब्द वारंवार बोलण्यात वापरतो तेव्हा ते आपल्या संस्काराचा भाग बनतात मग थोडंसुद्धा मनाविरुद्ध झालं की आपोआप धारधार शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतात. त्यामुळे आपली इच्छा जरी चांगले शब्द वापरण्याची असेल तरी ते वापरणे आपल्या नियंत्रणात राहत नाही मग आपण म्हणतो की मला चांगलंच बोलायचं होत. पण माझ्या मुखातून वाईटच शब्द बाहेर पडतात. आपण या सवयीचे एवढे आहारी जातो की घरी व दारी असेच शब्द वापरायला लागतो. त्यामुळे आपले व परके असे सर्वच संबंध धारधार शब्दांमुळे संपुष्टात येतात. बरेचदा शब्द हे कृतीपेक्षाही जास्त घायाळ करतात. जेव्हा आपण दुसऱ्याला आपल्या शब्दांनी किंवा कृतींनी दु:खी करतो तेव्हा आपल्यात मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती निर्माण होते व ती आपल्याला स्वत:ला घातक ठरते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात,विचारेंविण बोलों नये । विवंचनेविण चालों नये ।मर्यादेविण हालों नये । कांहीं येक ॥म्हणजेच सारासार विचार केल्याशिवाय बोलू नये. कार्य सुरू करताना सर्वांगीण बाजूंचा विचार केल्याशिवाय कार्य सुरू करू नये. नीती अनीतीचा विचार केल्याशिवाय हालचाल करू नये.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक