शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2018 : अशी करा बाप्पाची प्रतिष्ठापना; जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 12:43 IST

Ganesh chaturthi 2018 : 14 विद्या 64 कलांचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सर्व भक्तांचं श्रद्धास्थान असणारा बाप्पा थोड्याच दिवसात आपल्या लाडक्या भक्तांना भेटण्यासाठी येणार आहे.

Ganesh chaturthi 2018 : 14 विद्या 64 कलांचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सर्व भक्तांचं श्रद्धास्थान असणारा बाप्पा थोड्याच दिवसात आपल्या लाडक्या भक्तांना भेटण्यासाठी येणार आहे. सर्वांना त्याच्या आगमनाची ओढ लागली असून सध्या सर्वत्र त्याच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला संपूर्ण देशभरात गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते. या दिवशी भक्तीभावाने बाप्पाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. जाणून घेऊयात बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठीचा शुभ मुहूर्त आणि पूजेचा विधी...

पूजेचा शुभ मुहूर्त

बाप्पाच्या प्रतिष्ठापना करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 08 मिनिटांनी सुरू होणार. त्यानंतर दुपारी 1 वाजून 34 मिनिटांपर्यंत तुम्ही घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करू शकता. 

पूजेचे साहित्य - 

हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, अष्टगंध, सुपारी 10, खारीक 5, बदाम 5, हळकुंड 5, अक्रोड 5, ब्लाउज पीस 1, कापसाची वस्त्र, जानवी जोड 2, पंचा 1, तांदूळ, तुळशी, बेल, दुर्वा, फुले, पत्री, हार 1, आंब्याच्या डहाळे, नारळ 2, फळे 5, विड्याची पाने 25, पंचामृत, कलश 2, ताम्हण 1, पळी, पंचपात्र, सुटे पैसे, नैवेद्याची तयारी, समई, वाती, निरांजन, कापूर.

पूजेसाठी आवश्यक तयारी -

1. बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी योग्य ती आरास आदल्या दिवशीच करून घ्या. 2. मूर्ती मखरात ठेवून पूजेचं सर्व साहित्य तयार ठेवा. 3. प्रतिष्ठापना करताना देवाला सर्व गोष्टी उजव्या हातानेच अर्पण कराव्यात. 

अशी करा मूर्तीची प्रतिष्ठापना - 

1. पहिल्यांदा कपाळी टिळा लावावा.2. देवापुढे पान-सुपारी विडा ठेवावा.3. देवाला नमस्कार करून वडिलधाऱ्यांचे आशिर्वाद घेऊन पुजा सुरू करावी. 4. पूजेसाठी बसताना आसनावर बसावे. 5. हातात अक्षता घेऊन मनोभावे गणेशाचे नाव घेऊन अक्षता गणेशाच्या चरणी अर्पण कराव्यात.6. श्रीगणेशाचे नाव घेऊन कलश, शंख, घंटा, दिवा, समई यांची पूजा करावी. त्याचबरोबर गंध, अक्षता, फुले, हळद कुंकू वहावी.7. गणपतीच्या नावावर दुर्वा किंवा फुलांनी पाणी शिंपडावे. 8. गणपतीच्या चरणांवर गंध, फूल, अक्षता आणि पाणी अर्पण करावे. 9. गणेशाच्या मूर्तीवर पाणी शिंपडावे, चरणांवर पंचामृत वहावे, अक्षता वाहाव्यात.10.गणपतीच्या मूर्तीला गंध लावावे, हळद, शेंदूर, फुलं, हार, कंठ्या, दुर्वा वाहाव्यात.11.धूप, अगरबत्ती ओवाळावी. दीप, निरांजन ओवाळावे.12. गणपतीला नैवेद्य, प्रसाद अर्पण करावा. 13. देवासमोर पानाचा विडा ठेवून त्यावर दक्षिणा ठेवावी, समोरील नारळावर पळीभर पाणी सोडावं आणि त्यावर फूल वाहावं.14. देवच्या आरतीला सुरूवात करावी. 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganpati Festivalगणेशोत्सव