शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनांपासून मुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 05:31 IST

दारू, धूम्रपान, तंबाखू, गुटखा, जुगार ही व्यसने त्या मानाने खूप सामान्य आहेत. किमान यापासून मुक्तीचे अनेक मार्ग आहेत. परंतु ...

दारू, धूम्रपान, तंबाखू, गुटखा, जुगार ही व्यसने त्या मानाने खूप सामान्य आहेत. किमान यापासून मुक्तीचे अनेक मार्ग आहेत. परंतु अशी काही व्यसने असतात ज्यापासून मुक्तीचे मार्ग अनेकांना सापडत नाहीत आणि ते व्यसन आहे हे मान्य करायलाही अनेक जण तयार नसतात. या छुप्या व्यसनांमुळे त्यांची आत्मिक प्रगती पूर्णपणे थांबते. ही व्यसने पुढीलप्रमाणे : सतत चुगल्या करणे, सतत कुणाला ना कुणाला कमी लेखणे, विचार न करता चुकीचे बोलणे, शुभकार्यात अडथळे आणणे, दुसऱ्याच्या कामात मुद्दाम चुका काढणे, निर्व्यसनी माणसाला व्यसन लावणे, इतरांचा मत्सर करणे, सतत लाभाचाच विचार करणे, जातीपातीचे अवडंबर माजवणे, इतरांविषयी वाईट बोलत राहणे, कुणाच्याही भावनेची सतत उपेक्षा करणे, अपमानास्पद वागणूक देणे, गटबाजी निर्माण करून आपला स्वार्थ साधणे, फायद्यासाठी मैत्री करणे आणि फायद्यानंतर मैत्रीला तिलांजली देणे, विश्वासघात करणे, अंधश्रद्धा व गैरसमज निर्माण करणे, सत्य लपवून ठेवणे, सतत इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवणे, इतरांच्या कलेची चोरी करून आपल्या नावावर करून घेणे, विचार न करता कशावरही भाळणे, स्वत:ला कारण नसताना दोषी ठरवणे, मनातल्या मनात कुढत बसणे, तरुणांना वाईट संगत लावणे, सतत वासनाग्रस्त राहणे, इतरांच्या प्रगतीचा, यशाचा मत्सर करणे, अशा प्रकारच्या वृत्तीचे व्यसन असलेली माणसे ना स्वत: आनंदी राहत, ना इतरांना आनंदी राहू देत. या व्यसनमुक्तीला एकच मार्ग आहे तो म्हणजे स्वत:ला तपासून पाहून आपण असे का वागतो, हा प्रश्न सतत स्वत:ला विचारत राहणे. शारीरिक आजाराला औषध असते, पण मानसिक आजार बरा करण्यासाठी माणूस स्वत:च स्वत:ला सहकार्य करू शकतो. मनाची न बरी होणारी व्यसने कॅन्सरपेक्षाही घातक असू शकतात. व्यसन अंगाशी आल्यावरच हे लक्षात येत राहते. त्यामुळे अशा व्यसनापासून मुक्त होण्यातच खरा आनंद असतो.-विजयराज बोधनकर