शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘उपासनेची पाऊलवाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 02:47 IST

डोंगर रांगांमधून नागमोडी वळणाची पाऊलवाट जाते तेव्हा पांथस्थ, वाटसरू सांभाळून मार्गक्रमण करतात. सावधपणानं सर्वत्र नजर फिरवून दूरवर चालत गेलं की मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत जाणं शक्य होतं.

- कौमुदी गोडबोलेडोंगर रांगांमधून नागमोडी वळणाची पाऊलवाट जाते तेव्हा पांथस्थ, वाटसरू सांभाळून मार्गक्रमण करतात. सावधपणानं सर्वत्र नजर फिरवून दूरवर चालत गेलं की मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत जाणं शक्य होतं. बेसावध, गाफील राहिलं की गडबड होते. वर, खाली, उंच, सखल भागातून जाणारी पाऊलवाट माणसाला खूप शिकवून जाते. वळणा-वळणाची वाट जीवनाला वळण लावण्यास सहायक ठरते. सजग, जागृत राहिलं की चालताना खाली पडण्याचा, घसरण्याचा धोका संभवत नाही.मोहाचे, लोभाचे क्षण सांभाळले की पाऊलवाट देखील योग्य ध्येयापर्यंत घेऊन जाते. प्रत्येकाला प्रशस्त मार्ग प्राप्त होईल असं नाही. कधी कधी छोट्याशा पाऊलवाटेनं चालणं क्रमप्राप्त असतं. ही वाट त्रस्त न करता माणसाला आश्वस्त करते. त्यामुळे अस्वस्थता दूर निघून जाते. उमेदीनं, उल्हासानं, उत्साहानं मार्गक्रमण केलं जातं. मग अडचणी, अडथळे यांचा बाऊ वाटत नाही. ऐन उन्हामध्ये देखील थंडावा प्राप्त होतो. अडखळलं, ठेचकाळलं तरी त्यामुळे होणाºया जखमांची तमा बाळगली जात नाही.उंच जाताना धाप लागत नाही. प्रतिकूल वातावरणाचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही. ध्येयावर अविचल श्रद्धा असली तर पाऊलवाटही उपयुक्त ठरते. वाटेतल्या काट्यांची फुलं होतात. टोकदार दगड मखमली होऊन जातात. आजूबाजूची हिरवळ मनाला उभारी देते. झाडांच्या फांद्या थंडगार वारा घालू लागतात. रात्रीच्या अंध:कारात चांदण्यांचा चमचमता प्रकाश पाऊलवाटेवर पसरतो. त्यामुळे संकटाचं, अंधाराचं भय संपून जातं. माथ्यावर निळेशार आकाश, चंद्राची कोर, तारकांच्या माळा जीवन प्रवास सुखकर करतात. अशा छोट्याशा पाऊलवाटेवर भक्तीची भक्कम पावलं टाकली जातात. परमात्म्याच्या शक्तीवर अविचल निष्ठा असली की कठीण प्रवास सोपा होतो. निष्ठेसह जीवन प्रवास करताना निर्धार पक्का होत जातो. निष्ठा व निर्धार हातात हात घालून वाटचाल करतात तेव्हा निर्भयता येते. भीतीचा लवलेशही उरत नाही. आता पावलांना वेग येतो. भगवंत, भक्त, भक्ती यांची त्रयी त्रिविधता याला जुमानत नाही. मग ‘भवताप’ तरी कसा त्रस्त करू शकेल?उपासनेची सश्रद्ध पाऊलवाट प्रकाशवाट होऊन जाते. विश्वात्मक शक्तीची मदत मिळू लागते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक