शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

। आनंदाचा पूर ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:36 IST

‘पुण्य फळले बहुत दिवसा। भाग्य उदयाचा ठसा।।’ असं बहुत दिवसांचं पुण्य फळाला आलं म्हणून आम्हाला या वारीचा अनुभव घेता आला.

-इंद्रजित देशमुख-

‘पुण्य फळले बहुत दिवसा।भाग्य उदयाचा ठसा।।’असं बहुत दिवसांचं पुण्य फळाला आलं म्हणून आम्हाला या वारीचा अनुभव घेता आला. त्यातही या भाग्याची पूर्णावस्था आज अनुभवायला मिळणार आहे, कारण आज आमची ज्ञानेश्वर माउली भंडीशेगावहूुन निघून, तर आमचे तुकोबाराय पिराच्या कुरोलीतून निघून वाखरीत पोहोचणार आहेत. या दोन्ही आणि इतरही कितीतरी संतांच्या पालख्या वाखरीत येणार आहेत. समुद्राला मिळण्याअगोदर गंगेने जे विस्तीर्ण रूप धारण केलंय नेमकं तसचं पंढरपुरात पोहोचण्याअगोदर हा वैष्णवांचा महापूर वखरीत विसावणार आहे आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या‘जन्मोजन्मीचे संचित।भेटी झाली अकस्मात ।।’या वचनाप्रमाणे डोळ्यांचेच काय, सबंध देहाचे पारणे फेडणारे क्षण आम्ही आज अनुभवणार आहोत.आजच्या या सोहळ्यात आनंदाचा अक्षरश: पूर आलाय. पंढरपूर अगदी जवळ आलंय. ज्याच्या भेटीसाठी इतके दिवस चालत चालत कितीतरी वेळा पदरी आलेल्या अव्यवस्थेला व्यवस्था समजून जे चालणं झालं. प्रत्येक क्षणाला ज्याचा आठव या बुद्धीला स्पर्श करायचा आणि भेटीची हुरहूर नव्या उत्तेजनेने चाळवून जायचा. ज्याच्या भेटीच्या आसेने मन व्याकूळ झालंय, तो आमचा पांडुरंग परमात्मा आता आम्हाला भेटणार यामुळे हर्ष आणि उल्हास यांचा मिलाफ आमच्या अंगोअंगी उसळतोय. आजच्या क्षणाचं वर्णन करताना आमचे तुकोबाराय म्हणतात,‘पूर आला आनंदाचा।लाटा उसळती प्रेमाच्या।।बांधू विठ्ठल संगडी।पोहून जाऊ पैलथडी।।अवघेजण गडी।घाला उडी भाईनो।।हे तो नाही सर्वकाळ।अमूप आनंदाचे जळ।।तुका म्हणे थोरा पुण्ये।ओघ आला पंथे येणे।।’महाराज इथे आनंदाचा पूर आलाय म्हणतात. वास्तविक, सामान्य जगणं जगताना आमच्या अवतीभोवती निव्वळ आणि निव्वळ दु:खच किंवा निराशाच असते. अपेक्षा सुखाची किंवा आनंदाची असते आणि प्राप्ती मात्र दु:खाचीच असते. अगदी महाराजांच्याच भाषेत सांगायच झालं तर,‘संसार दु:खमूळ चहुकडे इंगळ।विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ।।’असं जगावं लागतं; पण इथं मात्र अंत:करणात आंनदाचं भरत आलेले तुकोबाराय आनंदाच्या पुराचं वर्णन करतात. आनंदाचा पूर आलेला आणि त्यावर उसळणाऱ्या प्रेमाच्या लाटा, म्हणजेच वारीत आंनद आहे. अगदी आंनदाचा पूर आहे; पण त्यातही प्रेमाचं आधिस्थान आहे कारण आमच्या जीवनात बºयाचदा आंनद निर्माण झाला की, त्या आंनदासोबत मद निर्माण होतो आणि त्यातूनच परत अपपरभाव किंवा परतिरस्कार भाव वाढतो. थोडक्यात काय, या सगळ्यातून संकुचितताच वाढीस लागते; पण इथे वारीत आलेला आनंदाचा पूर त्यावर उसळणाºया प्रेमाच्या लाटा हे सगळं सहजीवी आणि परसुखसंतोषी भावातून निर्माण होणार आहे म्हणूनच महाराज सगळ्यांना सांगतात की, ‘विठ्ठल नामाची सांगड बांधूया आणि सगळेचजण हा भवसागर तरुन जाऊया. याचसाठी सगळेजण या आनंदात उडी घ्या. वेगळे राहू नका. वरचेवर असा अमूप आंनद सोहळा आपल्याला अनुभवता येणार नाही. कदाचित आपली पुण्याईच थोर जेणेकरून हा आंनदपुराचा ओघ आपल्या वाटेत आलाय. या, यात न्हाऊया, मंगल बनूया.’आज दुपारी ज्यावेळी माउलींच्या आणि तुकोबारायांच्या अश्वांचे गोल आणि उभे रिंगण इथे संपन्न होईल ते सगळं शब्दात रेखाटता येणारच नाही. ते पताकाधारकांचं धावणं, विणेकºयांचं धावणं, माउलींच्या अश्वाचं धावणं हे सारं जन्मजन्मांतरासाठी हृदयात साठवावं आणि प्राण ओठात आणून आजन्म ही वारी माझ्याकडून कधीच चुकू देऊ नको, असं मागणं त्या पांडुरंगाकडे भरल्या डोळ्यांनी ओरडून घाय मोकलून मागावं, असं वाटतंय.माउलींच्या अश्वाच्या टपेखालची माती उचलून आपल्या भाळी लावताना जग जिंकल्यानंतर सुद्धा जी धन्यता आमच्या चेहºयावर दिसणार नाही, तो आंनद या वारकºयांंच्या चेहºयावर उमटतोय. या नि:स्सीम भक्तीने ओथंबलेल्या वारकºयांंच्या पायाखालची पायधूळ भाळी लावून धन्य व्हावं आणि या आनंदात स्वत:ला पूर्णपणे विरघळवून घ्यावं असंच वाटतंय.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)