शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बाह्य प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 03:31 IST

आज सगळीकडे घोषणाबाजीचं अध्यात्म सुरू आहे. घोषणाबाजीने आपण लोकांना एकत्र आणू शकतो, आपण जगात अनेक गोष्टी साध्य करू शकतो, पण घोषणांमुळे आपण आपल्या अंतरंगात मात्र डोकावू शकत नाही.

- सद्गुरू जग्गी वासुदेवआध्यात्मिक मार्ग तुम्हाला बाह्य प्रभावांच्या पलीकडे घेऊन जातो. अध्यात्माच्या नावाखाली आज जगात पुष्कळ गोष्टी घडत आहेत ज्यांचा अध्यात्माशी काडीमात्र संबंध नाही. अध्यात्माच्या नावाखाली नैतिकतेची शिकवण दिली जात आहे; घोषणाबाजी अध्यात्म म्हणून शिकवले जात आहे; सांत्वन आणि मानसिक दिलासा एक अध्यात्म म्हणून गणले जात आहे. तर हे समजून घेणे आवश्यक आहे की जो कोणी अध्यात्माच्या प्रक्रियेतून जाण्यासाठी सिद्ध आहे तो काही सांत्वन किंवा दिलासा शोधत नाहीये. त्याला ना धन-दौलतीची आशा ना कुठल्या घोषणाबाजी करणाऱ्या गटाचा सदस्य होण्याची इच्छा. ती व्यक्ती स्वत:वर पडलेल्या सर्व प्रभावांपासून मुक्त होऊन आणि त्यांच्या मर्यादांपलीकडे जाऊन; आतून आपले व्यक्तित्व वृद्धिंगत करत असते. आध्यात्मिक प्रक्रियेकडे पाहण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे, जेव्हा तुमच्यावर बिंबवलेले एकूणएक प्रभाव तुम्ही झटकून टाकता, बाहेरील परिस्थितीने तुमच्यावर पाडलेले सर्व डाग जेव्हा तुम्ही धुऊन काढता, तेव्हा स्वाभाविकपणे तुम्ही आध्यात्मिक बनता. पण आज सगळीकडे घोषणाबाजीचं अध्यात्म सुरू आहे. घोषणाबाजीने आपण लोकांना एकत्र आणू शकतो, आपण जगात अनेक गोष्टी साध्य करू शकतो, पण घोषणांमुळे आपण आपल्या अंतरंगात मात्र डोकावू शकत नाही. अनेक जण अध्यात्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी अगदी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. त्यातील अनेक उपक्रम अभिनंदनीय आहेत. त्याची स्तुतीच करावी लागेल. मात्र दुर्दैवाने काही ठिकाणी वेगळे अनुभव येतात. जगात बºयाच ठिकाणी अध्यात्माच्या नावाखाली दिशाभूल करण्याचे प्रकार होतात. काही हेतुपुरस्सर केले जातात तर काही अध्यात्माचे धडे देणारे स्वत:च अज्ञान आणि गैरसमजात बुडालेले असतात. म्हणून अध्यात्म म्हणजे नेमके काय हे आधी जाणून घ्यावे आणि मगच अध्ययन सुरू करावे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक