शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धात्मक संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 05:04 IST

आपण एका अति-स्पर्धात्मक जगात वावरत आहोत ज्या ठिकाणी प्रत्येकालाच सर्वोत्तम व्हायचे आहे.

- सद्गुरू जग्गी वासुदेवप्रश्न : आपण एका अति-स्पर्धात्मक जगात वावरत आहोत ज्या ठिकाणी प्रत्येकालाच सर्वोत्तम व्हायचे आहे. माझ्यासाठी योग्य मार्ग कोणता हे ठरविणे मला अवघड जात आहे; कारण मी जरीही एखाद्या गोष्टीत चांगला असलो, उदाहरणार्थ नृत्य, तरी तेथे माझ्यापेक्षा अधिक चांगले कोणीतरी असतेच. समाजाच्या आपल्याकडून सर्वोत्तम असण्याच्या अपेक्षांऐवजी केवळ आनंदी राहण्याच्या एकमात्र उद्देशासाठी एखादी कृती करण्याची प्रेरणा मी कशी मिळवू शकतो?सद्गुरू: आपल्याला केवळ आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करून दाखवायची असते. ही एक व्याधी आह़े कारण तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये तुम्ही आनंद मानत नाही, तर इतरांकडे नसलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही आनंद मानत असता. जेव्हा इतर लोकांच्या वेदना हा तुमच्या आनंदाचा स्रोत असतो, तेव्हा तो एक आजार आहे असेच म्हणावे लागेल. थोड्या कालावधीसाठी स्पर्धा करणे ठीक आहे. तुम्हाला शर्यतीत धावायचे आहे, ठीक आहे. आपली क्षमता अधूनमधून तपासून पाहण्यासाठी आपण खेळू शकतो आणि जणू काही आयुष्य यावरच अवलंबून असल्यासारखे शर्यत लढवू शकतो! परंतु जीवन ही शर्यत नाही. जीवन जर शर्यत बनले आणि जर तुम्हाला जिंकायचे असेल, तर तुम्हाला सर्वांत प्रथम अंतिम रेषेपर्यंत पोहोचावे लागेल. याचा अर्थ तुम्हाला कळतो का? मग तुम्ही न जिंकलेलेच बरे, तुम्ही सर्वोत्तम नसलेलेच चांगले. जितके उत्तम बनण्याची तुमची क्षमता आहे तितके उत्तम तुम्ही बनले पाहिजे. जे काही तुम्ही करू शकता, ते घडलेच पाहिजे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक