शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
2
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
3
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
4
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
5
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
6
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
7
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
8
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....
9
जगात भारी... Mumbai Indiansच्या जसप्रीत बुमराहने IPL मध्ये केला सर्वात 'जम्बो' विक्रम, 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर
10
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
11
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
12
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
13
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
14
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
15
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
16
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
17
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
18
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
19
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
20
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!

रहस्याचा अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 04:06 IST

इथल्या प्रत्येक घटनेमागे हेतू असतो. जन्म आणि मृत्यूमागेसुद्धा निसर्गाचा गुपित हेतू असावा.

- विजयराज बोधनकरइथल्या प्रत्येक घटनेमागे हेतू असतो. जन्म आणि मृत्यूमागेसुद्धा निसर्गाचा गुपित हेतू असावा. हे अंतराळ अनंत ग्रह ताऱ्यांनी व्यापलंय. त्यातलीच एक पृथ्वी आहे. हे अवकाश अनंतम्य प्रतीक आहे. पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. इथल्या प्रत्येक जिवाची एक पक्की भूमिका आहे. नियतीने ती ठरवून दिली आहे. याचं रहस्य कुणालाच ठाऊक नसल्यामुळे अनेक उत्तरांची प्रतीक्षा आहे. मानव हाच भाषेतून व्यक्त होणारा जीव आहे. सर्वात जास्त बुद्धीचा वापर करणारा जीव म्हणून मानवाकडे बघितलं जातं. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे बहुतांश कमी-जास्त फरकाने सर्व जिवांमध्ये आढळून येत राहतं, परंतु सर्वात जास्त या षड्रिपूच्या आधिन झालेला आढळून येतो. याचे कारण त्याचे अज्ञान. नियतीने प्रत्येक मानवी जिवाला भिन्न-भिन्न घडविले आहे. त्यांचे स्वभावगुण, दोष हे निसर्गनिर्मित असतात. याच बळावर ही पृथ्वी कार्यरत आहे. पाऊस जसा जगवितो, तसा नासाडी करीत सुटतो. ज्या हवेमुळे आपण श्वासोच्छवास घेतो, त्याच हवेचं उग्र वादळात रूपांतर झालं की, गावंच्या गावे उद्ध्वस्त होतात. त्याचप्रमाणे, मानवाच्या अस्तित्वाचं आहे. सात्विक, राजसी, तामसी या प्रवृत्ती नियतीच्या रचना आहे. मवाळ आणि जहाल स्वभावरचनासुद्धा जन्मताच मानव सोबत आणतो. या सर्व नियतीच्या कक्षा आहेत. त्याचा ज्या व्यक्तीला अभ्यास असतो, तो शांत राहून नियतीचे हे सारे खेळ बघत असतो. या गोष्टी लक्षात घेता, नियतीच्या या रहस्यमय रचनेचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. तो (न) केल्यामुळेच माणूस सतत दु:खाच्या फेºयात अडकलेला असतो. त्याचसाठी नियतीने वाईट वृत्तीची निर्मिती केली असावी. यालाच देव—दानवी युद्ध म्हणतात. या रहस्याचा अभ्यास, चिंतन, मनन करणे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे.

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक