शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

हरिपाठ

By admin | Updated: September 10, 2016 12:46 IST

वारकरी संप्रदाय हा भक्तीसंप्रदाय आहे. संप्रदायाचे अधिष्ठान श्रीविठ्ठल आहे. हे त्या निर्गुण निराकार आद्य परब्रह्माचे सगुण साकार रुप आहे.

डॉ. बाळासाहेब गरुड, ठाकूरबुवा वारकरी संप्रदाय हा भक्तीसंप्रदाय आहे. संप्रदायाचे अधिष्ठान श्रीविठ्ठल आहे. हे त्या निर्गुण निराकार आद्य परब्रह्माचे सगुण साकार रुप आहे. वारकऱ्याने भक्तिसाठी नित्यनेमाने पंढरीची वारी निष्काम भावाने करावी आणि हरिनाम उच्चारणाने आत्मरुपाने सर्वत्र भरलेल्या त्या विठ्ठलाचे अनुसंधान साधावे आणि त्याच्याशी संलग्न राहावे. यासाठीच नित्य हरिपाठाचा पाठ करावा असा संकेत आहे. या हरिपाठाच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ हा ग्रंथ रचलेला आहे तो संसारी जीवासाठी तसेच मुमुक्षु साधकासही मार्गदर्शन करतो. हरिपाठ म्हणजे वाचेने नामाचे उच्चारण पुन:पुन: करणे अशा पाठामुळे मंत्राक्षराची अबध्दता नष्ट होते. जिभेला नामाची सवय व गोडी लागते आणि भगवंताचे नामरुप हृदयात ठसते तसे पाहता हरिपाठ वा वेदपाठच आहे. ‘‘हरि :ओम तत्सत्’’ या महामंत्राचे ‘‘हरि मुखे म्हणा हरि मुखं म्हणा’’ हे प्राकृत रुप होय. ज्ञानदेवांनी राम, कृष्ण, गोविंद, गोपाळ, विष्णू, नारायण ही कामे हरिनामाच्या बरोबरीने नामस्मरणासाठी सांगितली. भगवंताचे स्वरुप मानवी कक्षेच्या आवाक्याबाहेरचे आहे. फक्त भगवंताचे नामरुप व आत्मरुप सुलभ आहे. नाम उच्चाराबरोबर मानव सहजच ईश्वराशी जोडला जातो. संत म्हणतात ‘‘नाम उच्चारिता कंठी । पुढे उभा जगजेठी।।’’ खरेच अत्यंत एकाग्रस्तेने मनुष्य हरिनामाशी जोडला जातो, त्यावेळी तो विश्वाला विसरतो आणि त्याच्या सर्व उर्मी शांत होतात. हाच त्याच्या जीवनातील धन्य काळ ठरतो. सामान्य व्यवहारी दृष्टीने पाहिले तर जगता कुठल्याही वस्तूचे स्मरण त्याच्या नावापासूनच सुरु होते. वस्तूच्या गुणरुपाचे स्मरण त्याचया नावापासूनच सुुरु होते. वस्तूच्या गुणरुपाचे स्मरण करण्यासाठी ती वस्तू प्रथम पाहिलेली असावी लागते. म्हणजेच स्मरणासाठी नामच सुलभ आणि परिपूर्ण ठरते. म्हणूनच सर्व पंथ नामस्मरणाचा आग्रह धरुन आहेत. ‘‘एकतत्व नाम दृढ धरी मना । हरिसि करुणा येईल तुझी ।।’’