शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पहाटेची निरामय शांतता जगण्याला ऊर्जा देते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 09:15 IST

विचार करायच्या सवयीने दिवस उजाडतो ही खरी पहाट आहे. पहाटेचे ताजेपण आनंद देते.

विचार करायच्या सवयीने दिवस उजाडतो ही खरी पहाट आहे. पहाटेचे ताजेपण आनंद देते. पहाटेची सुरुवात अनुभवणे ही एक आत्मस्फूर्ती ऊर्जा असते. ती शब्दात मांडता येत नाही. पक्ष्यांची किलबिल मनाला प्रसन्न करते. मनाचा ताजेतवाणा अनुभवणे ही एक आत्मानंदाची पर्वणीच होय. त्यावेळेस आपला अनुभव आकाशाशी एकरूप होतो. आपणच आपल्या अनुभवांना साद घालतो. स्वात्मसुखाच्या वाटा शोधतो. त्या उजळून निघाल्यासारख्या वाटतात. अरुणोदयाने कर्तृत्वाच्या प्रकाशवाटा उजाडतात. पहाटेच्या वातावरणात अखंड चैतन्याच्या लहरी असतात.

त्या सर्वांना आनंद देतात. पहाटेच्या चिंतनातून आपल्या जगण्याला बळ मिळते. मनातले संकल्प, विकल्प पारखता येतात, योग्य कार्याची निवड करता येते. त्यामुळे क्रियात्मक शक्तीला वजन लाभते. मनात निरपेक्ष आनंदाची पहाट निर्माण होते. मनात सत्यनिष्ठा वाढते. विवेकातली सत्कृती जागृत होते. म्हणून संतांनी पहाटेच्या काकड आरतीला विशेष महत्त्व दिले. पहाटेच्या मांगल्याप्रसंगी आत्मरंग पालटून जाते. क्षणभरासाठी का होईना दु:ख विसरून जातो. त्यावेळेस मनाला अलभ्य लाभ होतो. मनाचा ताजेपणा पहाटेच्या सुरात असतो. अमृतानुभव मांडता येतो. मनाला सौंदर्याची मोहर घालता येते. मन प्रफुल्लित होते. स्वात्मसाधनेला बळकटी येते. मनाचा हिरवेगारपणा त्यातून दिसतो. प्रसन्नतेची पहाट उजाडली जाते.

त्या पहाटेच्या अमृतवलयात आपण न्हाऊन निघतो. मनाला लाभत असलेली निरामय शांतता आपल्या जगण्याला ऊर्जा देते. पहाटेच्या कुशीत दु:ख रात्रींनी वेढलेल्या मनात सुखाचा मोहर फुटतो. त्यात आपण बागडतो. निसर्गाशी एकरूप होतो. अखंड चैतन्याचा अनुभव घेतो. मग सत्वर उच्चार अंगी येतो, जगणे अर्थपूर्ण होते. त्या अनुभवांशी आपली मैत्री घट होते. तो अनुभव कधी मिटत नाही, शिळा होत नाही. अखंड शब्दांच्या चैतन्यात तो स्फुरण पावतो, त्यातून त्याच्या अंगी आत्मचिंतनाचे बळ येते. अभ्यासाची पहाट उजाडते. सत्कर्माचे द्वार खुले होते. मन ताळ्यावर येते. मनातले दुर्गुण नाहीसे होतात. अंत:करणात बदल घडतो. सत्कर्म घडू लागते. त्यामुळे आपल्या जाणिवांची खोली लक्षात येते. वृत्ती विश्वात्मक बनू लागते. मनाला सत्कर्माचा पोत समजतो. पहाटेची आनंदमयी ऊर्जा सकारात्मकता वाढवते. खरंच विचारांची पहाट अनुभवास येते.डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)