शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 3

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:14 IST

दारिद्रय हे आपल्या देशात कमालीचे आहे. घरोघरी जीवनविद्या जावी व लोक सुखी व्हावेत ही आमच्या जीवनविद्या मिशनचे ध्येय तर घरोघरी दारू पोहचली जावी व सर्व लोक दारू पिणारे व्हावेत हे दारूबाज तळीरामांचे ध्येय असते.

- सदगुरू श्री वामनराव पैदारिद्रय हे आपल्या देशात कमालीचे आहे. घरोघरी जीवनविद्या जावी व लोक सुखी व्हावेत ही आमच्या जीवनविद्या मिशनचे ध्येय तर घरोघरी दारू पोहचली जावी व सर्व लोक दारू पिणारे व्हावेत हे दारूबाज तळीरामांचे ध्येय असते. गंमत अशी की जे गडक-यांनी विनोदाने लिहिले ती आज वस्तुस्थिती झालेली आहे.नाटक सिनेमामध्ये दारूला फार प्रतिष्ठा देण्यात येत आहे. टीव्हीवर मी एक नाटक पाहिले त्यांत दारू पिताना तो अभिनेता एका पेगने काय होते आहे असे म्हणतो व त्याला इतर देखील दुजोरा देतात.ही गोष्ट किती भयानक आहे याची जाणिव लोकांना आज नाही.ज्यांना खायला अन्न मिळत नाही,रहायला घर नाही ज्यांना शिक्षण मिळत नाही व ज्यांना वैद्यकिय मदत मिळत नाही ती मंडळी जीवनात खरेच दु:खी आहेत असे मी म्हणेन.खरी दु:खी कोण तर ही मंडळी खरी दु:खी आहेत.त्यांच्या दु:खाचे कारण म्हणजे दारिद्रय.हे दारिद्रय का आले हे आपण नंतर  पूढे पाहूया.दारिद्रय हे आपल्या देशात कमालीचे आहे.कोटयावधी माणसे आज जेमतेम एक वेळ जेवून जगतात.अर्थात हयाला कोण जबाबदार आहे? तर याला हयाला माणसे जबाबदार आहेत तसे सरकार देखील जबाबदार आहे.ही माणसे का जबाबदार आहेत तर लोकसंख्या किती वाढवायची.चीनची लोकसंख्या आज आपल्यापेक्षा जास्त आहे पण थोडयाच दिवसांत आपण चीनच्या पुढे जावू असे सांगितले जात आहे.नको त्या बाबतीत आपण पुढे जात आहोत.मी हे सर्व का सांगतो आहे.तर चीनमध्ये एका मुलापेक्षा जास्त मुले होऊ नयेत असा त्यांनी कायदाच केलेला आहे.एकापेक्षा जास्त मुले झाली तर त्यांच्या सवलती काढून घेतल्या जातात.सांगायचा मुद्दा आपल्या देशात असे होत नाही.आपल्याकडे हे बोलण्याचे धाडस देखील कुणी करीत नाही.कायदा करण्याचे तर सोडाच पण हा विषय काढण्याचे धाडस भल्याभल्यांमध्ये नाही.तुम्हांला जर मुलांना पोसता येत नाही तरी तुम्ही त्यांना जन्माला घालता याला जबाबदार कोण.मग आम्ही म्हणतो ही माणसे दरिद्री आहेत पण हयाला जबाबदार तीच माणसे आहेत.ही परिस्थिती ज्यांनी ओढवून आणली व ज्यांच्यामुळे ओढवली गेली हे दोघेही गुन्हेगार आहेत.तुम्ही मुलांना जन्म दिलात मग त्यांचे लालनपालन शिक्षण संवर्धन या सर्व गोष्टींची जबाबदारी देखील तुमचीच आहे.हे तुम्हांला करता येत असेल तर तुम्ही मुलांना जन्म द्या व हे करता येत नसेल आणि जर तरिही तुम्ही त्यांना जन्म दिला तर ती मुले उद्या तुम्हांला दोष देतील.मुलांना जर जन्म द्यायचा असेल तर त्यांचे लालनपालन शिक्षण सर्व तुम्हांला करता आले पाहिजे तरच त्यांना जन्म द्या अन्यथा मुलांना जन्म न दिलेला बरा असे आमचे स्पष्ट मत आहे.