शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 1

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:10 IST

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हा विषय अगदी आगळा व वेगळा असा आहे.सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हे वाचल्यानंतर माझी खात्री आहे की तुम्हांला असे वाटले असेल की वामनराव कुठेतरी चुकत आहेत.

- सदगुरू श्री वामनराव पैसुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हा विषय अगदी आगळा व वेगळा असा आहे.सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हे वाचल्यानंतर माझी खात्री आहे की तुम्हांला असे वाटले असेल की वामनराव कुठेतरी चुकत आहेत. दु:खी होणे सोपे सुखी होणे कठीण असे म्हणायला पाहिजे होते त्या ऐवजी वामनराव चुकून उलट सांगत आहेत असे तुम्हांला वाटण्याची शक्यता आहे. तुम्हांला असे वाटण्याचे कारण असे की आपण आतापर्यंत जे काही वाचत आलो ऐकत आलो ते असे की सुख पहाता जवापाडे दु:ख पर्वताएवढे. सुख किती जवाएवढे व दु:ख किती पर्वताएवढे पण जीववविद्या असे सांगते की सुख पर्वताएवढे व दु:ख जवाएवढे असे व्हायला पाहिजे. असे होवू शकते पण त्यासाठी काय  करायला हवे ते फार महत्वाचे आहे. दु:ख हे जन्मापासूनच माणसाच्या पाठीमागे लागते असे म्हटले जाते. जन्म दु:खम जरा दु:खम असे कोणीतरी एके ठिकाणी म्हटलेले आहे. जन्माला आल्यापासून दु:ख जे मागे लागते ते अगदी मरेपर्यंत असे म्हणण्याचा त्यांचा हेतू आहे.एके ठिकाणी असेही म्हटलेले आहे की “संसारा मानी जो सुख तो परम मुर्ख” “संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची” असेही काही ठिकाणी म्हटलेले आहे.कुणी काय काय म्हटलेले आहे हयाची मला जाणीव आहे.तरीही मी सांगतो सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण.आता यावर तुम्ही म्हणाल,”वामनराव आम्ही जे काही आतापर्यंत ऐकले त्याच्या नेमके उलट तुम्ही सांगता हे कसे काय? तसेच आम्ही आतापर्यंत ऐकत आलो की परमेश्वर कॄपा करतो किंवा कोप करतो पण तुम्ही म्हणता परमेश्ववर कोणावरही कृपाही करत नाही व कोपही करत नाही.तुमच्या जीवनविद्येत सगळंच कसे आगळं आणि वेगळं.”जीवनविद्येचे तत्वज्ञान खरेच आगळेवेगळे आहे.आणि तुम्ही ते आधी समजावून घ्यावे व तसे आचरण करण्याचा प्रयत्न करावा व तुम्ही सुखी व्हावे.किंबहूना तुम्ही आम्ही सारेच या तत्वज्ञानाने सुखी व्हावे अशी जीवनविद्येची संकल्पना आहे.यासाठी जीवनविद्येला असे मनापासून वाटते आपण सर्वांनी सुखी होऊ या.जगात काही जण सुखी तर काही जण दु:खी हे काही बरोबर नाही.आपण सर्व सुखी होऊ या. ही जीवनविद्येची भावना व धारणा आहे.जीवनविद्येची ही धारणा लक्षात घेवून जर तुम्ही जीवनविद्येचे तत्वज्ञान समजून घेतले तर तुम्हांला जीवनविद्येचे महत्व महात्म्य नक्कीच कळेल.पण त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण असे जर जीवनविद्या सांगते तर ते  नेमके कसे काय? कारण आमचा आतापर्यंतचा लोकांचा अनुभव असा आहे की दु:खी होणे सोपे सुखी होणे कठीण.बरे हा अनुभव फक्त आत्ताच्या लोकांचा आहे असा नव्हे तर पुरातन काळापासून तर  सर्वांचाच हा अनुभव आहे.