शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुर्बुद्धि ते मना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 03:59 IST

जर मन ‘रोगट’ राहिले, तर सद्बुद्धी अन् स्वत:च्या कार्यसिद्धीसाठी वापरण्यात येणारी बुद्धी दुर्बद्धीत परिवर्तित होते.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेकुठलेही चांगले काम कुणीही केले तर त्या कामाची मनापासून प्रशंसा करणे ही झाली माणसाची सद्बुद्धी, जी एखाद्या मिणमिणत्या पणतीसारखी सभोवतालचा अंधार नष्ट करण्याचे काम करते. उत्तम कामगिरी करणाऱ्याला त्यामुळे उत्तेजन आणि प्रेरणा मिळते. हे चक्र अबाधितपणे सुरू राहिले की चांगले काम करणाऱ्यांची समाजातील संख्या वाढत जाते. त्यात सातत्याने वृद्धी होत जाते. ते समाजाच्या हिताचे असते. म्हणून सद्बुद्धीचे प्रणेते संत ज्ञानोबा माउलीने म्हटले होते की,जैसी दीप कळीका धाकुटी । परी बहु तेजाते प्रकटी ।तैसी सद्बुद्धी ही धाकुटी म्हणो नये ॥सद्बुद्धीला कधी ‘धाकटी’ म्हणू नये, कारण सद्बुद्धीच सद्विचाराचे संवर्धन करून समाजात सद्भावनेच्या बागाङ्खफुलविण्याचे काम करते; पण दुसºयाच्या कार्याची प्रशंसा करण्यासाठी अन् सद्गुणाची पूजा बांधण्यासाठी मनाची निरोगी मशागत व्हावी लागते. या निरोगी मशागतीमुळे दुसºयाच्या चांगल्या कामाची स्तुती करण्याची स्थिती प्राप्त होते. जर मन ‘रोगट’ राहिले, तर सद्बुद्धी अन् स्वत:च्या कार्यसिद्धीसाठी वापरण्यात येणारी बुद्धी दुर्बद्धीत परिवर्तित होते. दुर्बद्धी जर डोक्यात घुसली तर समाजात ‘दुर्याेधना’चा जागोजाग सुळसुळाट व्हायला वेळ लागत नाही. दुर्योधनी प्रवृत्तीची दुर्जन माणसे दुर्याेधनाप्रमाणेच म्हणत राहतात, जनामि धर्मम न च में प्रवृत्ति। जनाम्य धर्मम् नच में निवृत्ति: मी धर्र्म जाणतो; पण त्याच्याकडे प्रवृत्त होता येत नाही, दुर्याेधनाची हीच प्रवृत्ती आज गल्ली-बोळातील आधुनिक दुर्योधन प्राणपणाने जतन करीत आहेत. सारे काही उत्तम चालले की त्यांना राहावत नाही. सरळ, शांत, संयमी, अहिंंसक समाजमन पाहिले की असे दुर्याेधन अस्वस्थ होतात आणि समाजाला हिंसेच्या ज्वालांनी होरपळून टाकावे यासाठी महापुरुषांच्या जयंती-मयंतीपासून ते जातीय, धार्मिक, राजकीय संघर्षामध्ये सद्बुद्धीचा बिनदिक्कत बळी दिला जातोय. समाजात अशी शेकडो माणसे आपल्याला भेटतात की ‘जे काहीतरी भानगड आहे’ याच अर्धसत्याच्या शोधार्थ दिवाभीताप्रमाणे रात्रीचा दिवस करतात आणि घरचे खाऊन गावाला शिक्षा देतात. मुळात ज्यांची वृत्तीच छिद्रान्वेशी आहे, जे नेहमी कुत्सीत बुद्धीने दुसºयाच्या वैगुण्यावर कावळ्यासारखी चोच मारण्यासाठी टपून बसलेली असतात. असे समाजकंटक अनेक ठिकाणी बिनदिक्कत वावरताना दिसतात. विनाकारण समोरच्यावर कडाडून टीका करणे हे त्यांचे जीवितकार्य असते. तसे झाले तरच त्यांना समाधान मिळते. ज्यांचे वर्णन करताना तुकोबांनी म्हटले होते, दुष्टबुद्धीच्या दुर्जनांची बुद्धी कधी अंतरंगातून भिजत नाही. त्याला जन्मभर उपदेश केला तरी पालथ्या घड्यावर पाणी ओतल्यासारखे होते. जन्माला आल्यानंतर जे स्वत: तमोगुणाच्या पाठीमागे वळतात, त्यांच्या हाती सद्बुद्धीचा दिवा देऊन काय उपयोग? गदर्भाला महातीर्थात स्नान घातले तरी त्याचा काहीच उपयोग नाही. वेळ आली की ते उकिरड्यावर लोळायला जाणारच. कितीही केले तरी पालथ्या घडावर पाणीच टाकल्यासारखे होते. घडा कधीच भरला जात नाही. श्रम मात्र वाया जातात. तेव्हा दुर्बुद्धीवर आयुष्यभर तोंडसुख घेत बसण्यापेक्षा ती निर्माणच होणार नाही यासाठी प्रत्येक कुटुंबनावाच्या सद्भावनेच्या विद्यापीठात जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावा. म्हणूनच तर तुकोबाराय म्हणाले होते -दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजों नारायणाआता मज ऐसे करी । तुझें पाय चित्ति धरी ।उपजला भावों । तुझे कृपे सिद्धी जावोतुका म्हणे आता । लाभ नाही या परता ।

टॅग्स :spiritualअध्यात्मिक