शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

कर्मफळी आस नसावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 04:42 IST

कर्म करण्याच्या अगोदरच जर त्याचा अभद्र हेतू उराशी बाळगून जर त्याचा पाठलाग करीत राहिले, तरी हेतू शुद्ध नसल्यामुळे पदरी निराशाच येते.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेजाणिवेच्या पातळीवरचा परमार्थ करणाऱ्या साधकासाठी श्रीमद्भगवदगीता हा ग्रंथ जीवन पाथेय आहे. गीतेमध्ये भक्ती व ज्ञानाचे रसाळ वर्णन मिळत असले, तरी त्याचा पाया निष्काम कर्म योगात मिळतो. आध्यात्मिकदृष्ट्या कर्माचे सर्वसाधारणपणे दोन प्रकार मिळतात. सकाम कर्म व निष्काम कर्म. ‘सकाम’ या शब्दातच नको त्या आशा अपेक्षांची अभद्र श्वापदे साधकाच्या भोवतीने घुत्कार घालू लागतात. म्हणून साधकाने सकामतेपासून सावध राहावे. सकामतेमध्ये पाप, पुण्य, धर्म, अधर्म प्रायश्चित, क्रियाकर्म यांचा नको तेवढा बागुलबुवा केला जातो. पाप क्षालनासाठी तीर्थाटनाचे उंबरठे झिजविले जातात. बरे! तेथे तीर्थातील शुद्धतेऐवजी नको ते कर्मकांडी खटाटोप केले जातात. तीर्थात स्नान करून शरीरावरील मळ धुऊन काढण्यापेक्षा, सत्कर्माचे पालन करून मनावरील मळ धुऊन टाकतो, तोच खरा परमार्थी अन्यथा परमार्थाच्या नावाखाली स्वार्थाची दुकाने थाटणाºया तथाकथितांना कर्माची महती कधी लक्षात येणार? महाभारतात उद्यम आणि प्रयत्नशीलता यांचे वर्णन केले आहे. भूगर्भात लपलेले पाणी कठोर परिश्रमाशिवाय बाहेर येत नाही. पेरलेले सगळेच उगवत नाही म्हणून पेरायचेच नाही, हे भेकडांचे तत्त्वज्ञान आहे. याउलट शंभर दाणे शेतात पेरले, त्यातले दहाच उगवले, तरी एका-एका जोंधळ्याच्या धाटावरील एका-एका कणसाला शंभर नव्हे, तर हजारो दाणे मोत्यासारखे लागतील. हे शेतकºयांचे होकारात्मक तत्त्वज्ञानच खरा कर्मयोग आहे. आपण आपले काम करावे. धरती आणि पर्जन्य आपले काम करील. हा शेतकºयांच्या मनातील सद्भाव म्हणजेच हेतूवीण आचरणात येणारी सत्क्रिया होय. जिथे वर्णन करताना संत ज्ञानेश्वर माउली म्हणतात,परी कर्मफळी आस न करावी ।आणि कुकर्मी संगती न व्हावी।हे सत्क्रियेचि आचरावी । हेतूवीण ।। ज्ञा.अ.2 ओ266कर्म करण्याच्या अगोदरच जर त्याचा अभद्र हेतू उराशी बाळगून जर त्याचा पाठलाग करीत राहिले, तरी हेतू शुद्ध नसल्यामुळे पदरी निराशाच येते. यापेक्षा मी माझे कर्म करीत राहीन. जर विश्वात्म्याला ती योग्य वाटली, तर तो योग्य फळ देईलच. कारण कर्म करणे हा माझा अधिकार आहे आणि कर्म फळाची फलनिष्पत्ती दाखविणे ही त्याची सदिच्छा आहे. कुठलीही सत्क्रिया ही हेतू वाचूनच आचरीली जाते. आपण निदान स्वार्थाशिवाय एखादे सत्कर्म, कुठलीही सकामता न ठेवता प्रयत्न करू या!

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक