शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

नामाच्या अनुसंधानातूनच होतो भगवंताचा दिव्य साक्षात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 13:13 IST

आत्मनिवेदनात प्रवेश करणाऱ्या भक्ताच्या ठिकाणीच सर्वात्मक भाव निर्माण होतो..!

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

सर्वांभूती भगवद् भाव हेच श्रीमद् भागवताचे प्रधान भक्तिसूत्र आहे. शांतीसागर एकनाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात,

सर्वांभूती भगवद् भावोया नाव मुख्य भक्ती पहा होतो सांगाती झालिया स्वयमेवोकाम क्रोध मोहो न शकती बाधु

आता प्रश्न असा आहे की, हा सर्वात्म भाव कसा प्राप्त होतो..? तो प्राप्त होण्याचे साधन कोणते..? सज्जनहो..! हा सर्वात्म भाव सहजासहजी प्राप्त होत नाही. त्यासाठी अविरत साधना करावी लागते. सामान्य प्रापंचिक माणसाला हा भाव प्राप्त होण्यासाठी पिपीलिका मार्गानेच जावे लागते. हा सर्वात्म भाव प्राप्त होण्यासाठी एकनाथ महाराजांनी सात प्रधान पायर्‍या सांगितल्या आहेत.1)अनुताप2)अनुग्रह3)अनुकरण4)अनुसंधान5)अनुराग 6)अनन्य भाव 7)आत्मनिवेदनयाच त्या पायर्‍या आहेत. आता क्रमशः यांचे थोडक्यात विवरण करू...!परमार्थ साधनेला अनुतापापासून प्रारंभ होतो. त्रिविध तापाने त्रस्त झाल्याने व विषय सुखाचा वीट आल्यानेच साधक भगवद् भक्तीकडे ओढला जातो मग त्याला संत साहित्याचे श्रवण घडते. या श्रवणामुळे साधकात विवेक जागृत होतो. विवेक जागृत झाल्यामुळे संसाराविषयी तिरस्कार व परमेश्वराविषयी परमप्रेम त्याच्यात निर्माण होते. या प्रक्रियेलाच अनुताप असे म्हणतात असा अनुताप निर्माण झाला म्हणजे साधक अनुग्रहाकरिता सद्गुरु कडे जातो व त्यांच्या मार्गदर्शनाखाली परमार्थाची वाटचाल करतो. सद्गुरु साधकाला उपदेश करतात,

तेचिं उपदेश लक्षण वाचेसि माझे नाम कीर्तन शरीरी माझे नित्य भजन मद्रूपी मन निमग्न सदासद्गुरुच्या कृपेने साधकात नामसंकीर्तनाविषयी प्रेम, श्रद्धा, निष्ठा वाढत जाते व परमेश्वराविषयी अनुराग वाढत जातो. सद्गुरु कृपेने भक्ती दृढ, निष्ठ बनली म्हणजे साधक चढत्या वाढत्या प्रेमाने परमार्थ प्राप्तीची साधना करू लागतो. तो सद्गुरुचे अनुकरण करू लागतो. सद्गुरु जसे सदैव आत्मचिंतनात निमग्न असतात तसे साधक देखील वागू लागतो अशा प्रकारे सद्गुरुचे अनुकरण साधकाच्या भक्ती वाढीस पोषकच ठरते. नामाच्या अनुसंधानात त्याला भगवंताचा दिव्य साक्षात्कार होतो. नाम घेता घेता नाम धारकाची प्रतिभा जागृत होते. आणि ह्रदयस्थ परमेश्वराचे त्याला दर्शन होते मग साधक अनन्य भावाने भगवंताचीच भक्ती करू लागतो. अनन्य भक्ती दृढ झाल्यावर भक्त हा आत्मनिवेदनात प्रवेश करतो, असा हा क्रम आहे. आत्मनिवेदनात प्रवेश करणाऱ्या भक्ताच्या ठिकाणीच सर्वात्मक भाव निर्माण होतो..!

( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क क्रंमांक - 8329878467 ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक