शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

विरहभक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 03:12 IST

कृष्ण मथुरेला गेला. कंसाचा वध केला, पण गोकुळात परत आला नाही. तरी गोपींबद्दल त्याच्या मनात काळजी होतीच.

- शैलजा शेवडेकृष्ण मथुरेला गेला. कंसाचा वध केला, पण गोकुळात परत आला नाही. तरी गोपींबद्दल त्याच्या मनात काळजी होतीच. त्या आपल्या विरहात वेड्या झाल्या असतील, ही जाणीव होतीच. म्हणून त्याने आपल्या मित्राला, उद्धवाला, जो खूप ज्ञानी-थोडा अहंकारी होता. त्याला गोकुळात पाठविले. हेतू हाच की, त्याला भक्ती म्हणजे नेमके काय, ते कळावे. उद्धव गोकुळात आला. गोपींना भेटला. कृष्णाचा सखा आपल्यासमोर असल्याचे पाहताच त्यांच्या भावनांचा बंध सुटला. त्या रडू लागल्या. रडता-रडता म्हणू लागल्या, ‘कृष्ण मथुरेला जाऊन आम्हाला विसरला. तिथे त्याला सुंदर स्त्रिया भेटल्या असतील, ज्या त्याच्यावर मोहीत झाल्या असतील. तो का आमची आठवण काढेल.’ तेवढ्यात तिथे एक भुंगा आला. कृष्णविरहात दग्ध गोपीला तो भुंगा कृष्णाचा दूत वाटला. त्याला उद्देशून उपरोधिक स्वरात म्हणू लागली,जा जा जा मधुकरा, कृष्णदूता भ्रमरा,स्पर्शू नको चरणांना अमुच्या, चंचला भ्रमरा,गुंजारव की गीत तुझे हे, गुणवर्णन कृष्णाचे,दाखव गाऊनी त्याच्या सांप्रतच्या प्रियतमांनाकृष्णापरी तू कपटी चंचल, समजले आम्हाला,सुमनामधला सेवून मधु तो, सहजच त्यागी त्यालामधुर बोलुनी, अनुनय करसी, ओळखले परी तुला,त्या कृष्णाचा दूत तू असशी, तशाच तुझ्याही लीलागोपींचा तो उत्कंठीत भाव बघून उद्धवाने त्यांची स्तुती केली. कृष्णाचा निरोप दिला. ‘गोपींनो, मी सर्वत्र आत्मरूपाने असल्यामुळे तुमचा आणि माझा वियोग संभवत नाही. विरहामुळे तुम्हाला माझा अहर्निश ध्यास लागून तुमचे मन वेगाने माझ्याकडे ओढले जावे. तुम्ही अहर्निश माझे स्मरण करा. म्हणजे लवकरच माझ्या स्वरूपाला प्राप्त व्हाल.’ कृष्णाचा तो संदेश ऐकून गोपींचे विरहदु:ख नाहीसे झाले. श्रीकृष्ण आपल्या अंतर्यामी नित्य आहे, हे जाणून त्यांनी गुरुबुद्धीने उद्धवाची पूजा केली.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक