शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

अस्वलासारखे रानावनात भटकून संतपणा मिळत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 06:45 IST

संत कुणाला म्हणावे? या प्रश्नाचे उत्तर जो-तो आपल्या डोक्याच्या आकाराने देण्याचे काम करतो.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेसंत कुणाला म्हणावे? या प्रश्नाचे उत्तर जो-तो आपल्या डोक्याच्या आकाराने देण्याचे काम करतो. आज तर जो रुद्राक्षांच्या माळांच्या भाराने वाकला आहे, हातभर दाढी आणि डोईवर केसाचे जंगल पसरले आहे, कधी भगवे, कधी पिवळे, तर कधी निळ्या-हिरव्या कवड्यांनी ज्याने स्वत:स गुंडाळून टाकले आहे; अशा मंडळींस संत मानण्याची खूप मोठी चूक बुद्धिप्रामाण्यवादाचा डंका वाजविणाऱ्या मंडळींकडूनही होते. मुळात संत ही एक आकृती, प्रकृती, विकृती, संप्रदाय, पंथ, जात नाही, तर संत ही एक संस्कृती आहे. संत हा एक विचार आहे. संतपणा जगावा लागतो, दाखवावा लागत नाही. जगाच्या बाजारपेठेत दोन-पाच हजारांत संतपणा विकत मिळत नाही. अस्वलासारखे रानावनात भटकून संतपणा मिळत नाही. उंदीर, घुशीप्रमाणे बिळात राहून संतपणा नाही. ज्याचे वर्णन करताना तुकोबारायही म्हणाले होते...‘नही संतपणा मिळते हे हाटी, हिंंडता कपाटी रानीवनी ।नये मोल देता धनाचिया राशी, नाही ते आकाशी पाताळीतोतुका म्हणे मिळे जीवाचियेसाठी, नाहींतरी गोष्टी बोलू नये ॥’जगाच्या बाजारात संतत्वाला खरेदी करता येत नाही. कारण विकावू समाजाची निर्मिती करण्यापेक्षा जीवनमूल्यावर टिकाऊ पाईक निर्माण करणे हाच संताच्या जीवित्वाचा उद्देश असतो. दुर्दैवाने आज आपली नेमकी या सत्याच्या उलट दिशेने वाटचाल सुरू आहे. सत्ता, संपत्तीच्या जोरावर आज अनेक दुर्योधन व दु:शासन संत व योग्यांना एका रात्रीत खरेदी करीत आहेत. मेंढरांचा सेनापती एकदा खरेदी केला की बाकी मेंढरे आपोआप त्याच्या पाठीमागे येतात या दाहक सत्याची जाणीव तथाकथित दुर्योधनांना झाल्यामुळे संतत्व हा खरेदी-विक्रीतला वस्तू विनिमत्तातला कोरडा व्यवहार ठरत आहे. संतत्व ही सात्त्विक प्रवृत्तीची फुलबाग आहे. संत म्हणजे सर्वत्र ममता, संत म्हणजे सर्वत्र समता, संत म्हणजे निर्मत्सरता, संत म्हणजे बुडणाºया जीवास वाचविणारा संसार सागरातील नावाडीच होय.