शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 2

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:11 IST

पुष्कळ वेळी माणूस कारण नसताना दु:खी होतो.पुरातन काळापासून म्हणजे अगदी त्रेतायुग ते द्वापारयुग व आता कलीयुगापर्यंत सर्वांचा हाच अनुभव आहे

- सदगुरू श्री वामनराव पैपुष्कळ वेळी माणूस कारण नसताना दु:खी होतो.पुरातन काळापासून म्हणजे अगदी त्रेतायुग ते द्वापारयुग व आता कलीयुगापर्यंत सर्वांचा हाच अनुभव आहे दु:खी होणे सोपे व सुखी होणे कठीण.असे असताना सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण असे आम्ही सांगतो हयाचे कारण असे की, आपण जीवन जगत असताना ज्या त-हेने जीवन जगले पाहिजे त्या त-हेने आपण जीवन जगत नाही.आपल्या मनात काही विचित्र कल्पना असतात भावना असतात.तसेच काही धारणा झालेल्या असतात व संकल्पना झालेल्या असतात.पूर्वजन्मीच्या हया सर्व गोष्टी घेऊनच आपण या जन्माला आलेले असतो. आत्ताच्या आपल्या जन्मानंतर आपल्यावर विविध संस्कार होतात.हे संस्कार आपल्या पूर्वीच्या संस्कारांना सिमेंट काँक्रिट करतात व मरताना पून्हा आपण हे संस्कारच घेऊन पुढील जन्मामध्ये जातो| पुन्हा जन्माला येतो तेव्हा पुन्हा तेच.म्हणून संत  तुकाराम महाराज म्हणतात,“किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित” हयातून सुटका करून घ्यायची असेल तर आधी माणूस सुखी का होतो? व माणूस दु:खी का होतो? हे समजून घेतले पाहिजे तसेच मनुष्य सुखी केव्हा होतो व दु:खी केव्हा होतो हे देखील समजून घेतले पाहिजे.या सर्वातून एक गोष्ट आपल्या लक्षांत येईल की पुष्कळ क्षणी माणूस कारण नसताना दु:खी होतो. खरंतर कारण काहीच नसते तरी देखील आपण दु:खी होत असतो.घरात सर्व रेलचेल असते.घरात काहीही कमी नसते.श्रीमंती ओतप्रोत भरलेली असते.घरातले कपाट अक्षरश: नोटांनी भरलेले असते.पण तरिही माणूस दु:खी असतो.एका माजी मंत्र्याच्या घरात नोटांनी भरलेल्या गोणी सापडल्या.सांगण्याचा उद्दीष्ट हा की असे सगळं असताना सुध्दा म्हणजे श्रीमंती आहे, मुलेबाळे आहेत,सुनाजावई आहेत तरी माणसे दु:खी असतात.ज्याच्याकडे काही नाही तो जर दु:खी झाला तर एकवेळ आपण समजू शकतो.ज्याला रहायला घर नाही किंवा ज्याला खायला देखील मिळत नाही,ज्याला अगदी प्यायलाही मिळत नाही.आता इथे प्यायला म्हणजे पाणी मिळत नाही हे लक्षात घ्या नाहीतर बाकीचे पिणे कुठेही सहज मिळते.देव सर्वव्यापी आहे असे म्हणतात तसं दारू सर्वव्यापी असे म्हटलं पाहिजे.मला माहित नाही पण लोक असं म्हणतात की,”कुठेही जा दारू तुम्हांला कुठेही सहज मिळेल म्हणजे अगदी जिथे दारूबंदी आहे तिथेसुध्दा दारू मिळू शकते.या जगात आज दारू पिणारे लोक 99 टक्के आहेत व जे लोक दारू पित नाहीत त्यांना हे लोक हसतात, त्यांची निंदा करतात,कुचेष्टा करतात.दारूचे इतके महात्म्य वाढलेले आहे हे आश्चर्य करण्यासारखे आहे.गडकयांच्या एकच प्याला नाटकात तो तळीराम काय म्हणतो की ,मी एक मंडळ स्थापन केलेले आहे व आमच्या मंडळाचे ध्येय काय तर जगांत दारू सर्वत्र पोहचावी.गडकरी हे विनोदी नाटककार होते.त्यांनी जी नाटके लिहिली ती वाचली किंवा पाहिली तर अशी नाटके पुन्हा होणे नाही असे वाटते.त्यांनी लिहीलेले संवाद मोठे असायचे ते आताच्या लोकांना पाठही होणार नाहीत.पण असा माणूस देखील असे लिहून ठेवतो.