शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 20:50 IST

आपण जीवन प्रवासाला निघालेले आहोत व आपली गाडी चुकलेली आहे.आज आपण मी हिंदू, मी मुस्लिम, मी ख्रिश्चन, मी बौध्द या गाडीत बसलेले आहोत.गाडी कुठली पाहिज तर मी माणूस.मी माणूस ही गाडी अचूक बरोबर मग त्या गाडीत बस.

- सदगुरू श्री वामनराव पै

जीवन जगणे ही कला, शास्त्र व विद्या आहे.

आपण जीवन प्रवासाला निघालेले आहोत व आपली गाडी चुकलेली आहे.आज आपण मी हिंद,ू मी मुस्लिम, मी ख्रिश्चन, मी बौध्द या गाडीत बसलेले आहोत.गाडी कुठली पाहिज तर मी माणूस.मी माणूस ही गाडी अचूक बरोबर मग त्या गाडीत बस. मी माणूस या गाडीत बसलास की तू हिंदूचा द्वेष करणार नाहीस, मुस्लिमांचा द्वेष करणार नाहीस, ख्रिश्चनांचा द्वेष करणार नाहीस कारण ही सर्व माणसे आहेत हे तुझ्या लक्षात येईल.मी माणूस आहे व मी माणसासारखे वागले पाहिजे.माणसासारखे वागणे हयालाच खरा धर्म म्हणतात.जगातील सर्व माणसे याप्रमाणे वागू लागली तर जगात सुखच सुख होईल.जगातील माणसे त्याप्रमाणे वागतील तेव्हा वागतील पण आपण आपल्यापासून तरी सुरवात करूया.आम्ही जीवनविद्या मिशनमध्ये येणा-या माणसाची आधी ही  मानसिकता बदलतो.आम्ही काय करतो? त्यांची गाडी जी चुकलेली आहे ती रुळावर आणतो.बाकी आम्ही काही करत नाही.उदी भस्म देत नाही.अंगारेधुपारे देत नाही.खडे अंगठया देत नाही.उभेआडवे गंध लावायला सांगत नाही.तीर्थयात्रा करायला सांगत नाही.ग्रंथाची पारायणे करायला सांगत नाही.पुस्तकांचे वाचन करायला सांगतो पण पारायणे करायला सांगत नाही.पारायण का करायला सांगत नाही.ते वाईट आहे असे नाही पण हे करून तुम्हांला जे ज्ञान मिळायला पाहिजे ते मिळत नाही.जीवन जगणे ही एक कला आहे, ते एक शास्त्र आहे, ती एक विद्या आहे,ही कला प्रथम समजून घे.आज आम्ही जीवनाचा प्रवास करायला निघतो पण आपली गाडी चुकते,डबा चुकतो, वेळ चुकत,े स्टेशन चुकते आणि आपण दु:खाच्या खाईत लोटले जातो.आपली गाडी कुठली?मी माणूस आहे.मी माणूस आहे व माझ्या आजूबाजूला सर्व माणसे आहेत.आपण सर्व देवाची लेकरे आहोत असे म्हटले की विश्वबंधुत्व आले.हिंदू धर्मात काय शिकविले जाते?हिंदू धर्मात हेच शिकविले जाते की आपण सर्व देवाची लेकरे आहोत.हिंदू धर्माने तर फक्त माणूस नव्हे तर सर्व भूतमात्रांचा विचार केलेला आहे.इथे बंधुत्व आलेच पण धर्मातले लोक त्याप्रमाणे वागत नाहीत याला कोण काय करणार? धर्म सांगतो, दारू प्यायची नाही हा दारू पितो.धर्म सांगतो, खून करायचा नाही तरी हा खून करतो.धर्म सांगतो, माणसासारखा वाग तरी हा राक्षसासारखा वागतो आता याला कोण काय करणार?धर्माने सांगितले एक व आणि हा करतो दुसरेच.याला धर्म काय करणार सांगा.