शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

ढेकणाच्या संगे हिरा जों भंगला; कुसंगे नाडला साधू जैसा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 00:34 IST

खळांना कितीही कुरवाळण्याचा प्रयत्न केला तरी साधूने विचंवास कुरवाळल्यासारखे आहे.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेमाणसाच्या भोवतीने असलेल्या गोतावळ्यात सुविचार आणि सुसंस्कारांची जोड असणारा एक जरी मित्र असेल तर जीवन स्वर्ग बनते आणि प्रचंड आघात होत असतानासुद्धा मित्र नावाचा सारथी तोल सावरण्यासाठी धावून येतो. ‘वाटेवरील काटे वेचत आणि खड्डे भरतच तुला पुढे जायचे आहे,’ या कटू सत्याची जाणीव करून देतो तोच खरा मित्र. जो आपल्या रसदृष्टीने कुरूपतेमध्येही सुरूपता निर्माण करून जीवनाची वेल हिरवीगार करण्याचा प्रयत्न करतो असा सज्जन सखा केवळ अभावानेच भेटतो, अन्यथा चोहीकडे भेटतात ती सायंकाळची जोडणी लावणारी, कुणाचा तरी कार्यक्रम करणारी आणि समाजजीवन ‘अस्वस्थ’ करणारी ‘दुर्जन’ मंडळी. ही जर आपल्या भोवतीने सापासारखी वळवळत असतील तर लोक आपलीही गणना या दुर्जनांतच करतात. म्हणून या दुर्जनांत मी असलो तरी त्यांच्यासारखा जगत नाही, असे म्हणण्यात काहीच पुरुषार्थ नाही. मी दुर्जनांच्या संगतीत राहतो, पण मी तसा नाही असा किती जरी डंका पिटला तरी लोक आपल्याला खळ दुर्जनांचा साथीदार म्हणूनच ओळखणार. त्यापेक्षा खळांची संगतीच नको. या संगतीच्या दुष्परिणामाचे वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात -काय ढोरांपुढे घालुनी मिष्टान्न,खरासी विलेपन चंदनाचे।नको-नको देवा खळांची संगती,रस ज्या पंगती नाही कथे ।काय सेज बाज माकडा विलास,आळंकारा नाश करूनि टाकी।तुका म्हणे काय पाजूनी नवनीत,सर्पाविष थीत अमृताचे॥खळांना कितीही कुरवाळण्याचा प्रयत्न केला तरी साधूने विचंवास कुरवाळल्यासारखे आहे. कोणे एके काळी वाल्या कोळ्याचा वाल्मीकी ऋषी झाला असेल, पण आज शेकडो वाल्या कोळी नारदाचीच शिकार करण्यासाठी टपून बसले आहेत. अशा परिस्थितीत खळांना खड्यासारखे बाजूला करावे यासाठी एकापेक्षा एक सरस दृष्टांत देताना तुकोबा म्हणतात, ढोरांपुढे अथवा रेड्यापुढे पंचपक्वान्नाचे ताट मांडून काहीच उपयोग नाही. रेडा आपल्या मस्तीने त्याला उधळून लावून गावाबाहेरची नरकाडी करायला जाणारच. गाढवाच्या सर्वांगाला चंदनाचा लेप लावला तरी हुक्की आल्यानंतर ते उकिरडा घोळायला जाणारच. माकडाच्या गळ्यात माणिक बांधून सुंदर कॉटवर त्याला गुबगुबीत अंथरूणे दिली तरी ते झाडाच्या या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारायला जाणारच. अगदी तसेच या खळांचे आहे. यांना सात्त्विक, ऋजू, संस्कारी, सत्त्वगुणी भाषा कळत नाही तर त्यांना तमोगुणी भाषेच्या जोड्यातच उत्तर द्यावे लागते, पण असे उत्तर देण्यासाठी सज्जन माणसे पुढे जात नाहीत. कारण आज सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रांत वेगवेगळे मुखवटे धारण करून खळांचा राजरोस संचार होत आहे. सज्जनास दुर्बळ ठरवून खळांचे साम्राज्य जेव्हा निर्माण होते तेव्हा सज्जनांनो! नेभळटपणाने खळांचे अत्याचार सहन करीत ‘आता आपण उगी राहावे, जे-जे होईल ते-ते पाहावे’ ही भूमिका सोडून देऊन सज्जन शक्तीने संघटित होऊन खळांचा प्रतिकार केला तर खळांची कोल्हेकुई निश्चित थांबणार आहे. म्हणूनच तुकोबाराय म्हणाले होते -ढेकणाच्या संगे हिरा जों भंगलाकुसंगे नाडला साधू जैसा ।भावे तुका म्हणे सत्संग बराकुसंग हा फेरा चौऱ्यांशिचा ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक