शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

धर्मग्लानी हा मधुमेह तर विषयासक्ती हे रक्तदाब..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 18:54 IST

वाढत्या चंगळवादाने आमचे जीवन जगण्याचे संदर्भच बदलले आहेत. आम्हाला धर्म म्हणजे अफूची गोळी आहे असे वाटते. धर्म जीवनाची व्यवस्था आहे.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

धर्म म्हणजे काय..? धर्म का हवा..? आजच्या प्रगतीच्या काळात धर्माची खरंच गरज आहे का..? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. आजच्या लेखमालेत आपण या प्रश्नांवर थोडे चिंतन करु यात. महाभारतकार धर्माची व्याख्या करतांना म्हणतात -धारणात् धर्म इत्याहु: । धर्मो धारयते: प्रजा: ॥यस्यात् धारण संयुक्त:। सधर्म: इति निश्चय: ॥ज्यायोगे प्रजेची धारणा होते, त्याला धर्म म्हणा. आता आपण म्हणाल, धारणा म्हणजे काय..? तर धारणा म्हणजे व्यवस्था. व्यवस्था म्हणजे नियम, नियम म्हणजे विधी आणि निषेध, विधी म्हणजे हे करा अशी आज्ञा आणि  निषेध म्हणजे हे करु  नका अशी आज्ञा. अशी विधीनिषेधात्मक जीवन जगण्याची जी घटना त्याला धर्म म्हणावे. देश चालावा म्हणून जशी घटनेची गरज असते तसे मानवी जीवन समृद्ध व सुखी होण्यासाठी धर्म नावाच्या घटनेची नितांत गरज आहे. धर्म आम्हाला नीती शिकवतो मग नीतीशिवाय जीवन असते का.? तात्पर्य काय तर नीती म्हणजेच धर्म. अध्यात्माच्या मार्गानेच हा जीवन प्रवास सुखकर होईल. जर या नीतिरथाची चाके विवेक आणि संयम असतील तर कधीच अपघात होणार नाही. धर्म हा सारथी असावा. पुरु षार्थ हे घोडे असावेत. भक्ती हा लगाम असावा आणि ईश्वरश्रद्धा हा ब्रेक असावा, मगच जीवनाचा रथ हा योग्य मार्गाने जाईल. 

आज धर्मग्लानीचा काळ आहे. वाढत्या चंगळवादाने आमचे जीवन जगण्याचे संदर्भच बदलले आहेत. आम्हाला धर्म म्हणजे अफूची गोळी आहे असे वाटते. धर्म जीवनाची व्यवस्था आहे. धर्म नको वाटणं म्हणजे व्यवस्था अमान्य केल्यासारखे आहे. आम्हाला विकारविवशतेने ग्रासले आहे. धर्मग्लानी हा मधुमेह तर विषयासक्ती हा रक्तदाब (ब्लडप्रेशर) आहे. या दोन व्याधींनी ज्यांना ग्रासले आहे, त्यांना धर्माच्या अतिदक्षता विभागात ठेवले पाहिजे. धर्म तर गंगाजलासारखा पवित्र आहे. आपण फक्त कर्म कांडालाच धर्म समजतो. माझे प्रत्येक कर्म हे ईश्वराला आवडणारे असले पाहिजे, हे धर्मच सांगतो. धर्माची व्याप्ती खूप व्यापक आहे, फक्त देवळातले कर्म म्हणजेच धर्म नाही. तो धर्मशास्त्रा अंतर्गत छोटासा भाग आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, संडासपासून ते राजसिंहासनापर्यंत आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जेवढे कर्म आम्ही करतो तेवढे कर्म म्हणजे धर्म होय. सुरांशिवाय संगीत असते का.? पाण्याशिवाय नदी असते का.? सुगंधाशिवाय फुले असतात का.? अगदी तसं आणि तसंच धर्माशिवाय माणसाचे जीवन असते का..? समाज धारणेसाठी धर्माची नितांत गरज आहे. धर्म कधी हिंसा, द्वेष, मत्सर, असूया, वैरभाव करायला शिकवत नाही. धर्म तर मानवी जीवनात दया, दाक्षिण्य, परोपकार, समता, बंधुता, एकता, या जीवन मूल्यांची शिकवण देतो, म्हणून धर्म हवा आहे.

(लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत.मोबाईल क्र. 9421344960 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक