शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भावभक्ती आणि कृतिभक्ती

By appasaheb.patil | Updated: October 18, 2019 19:49 IST

आपले जीवनही आज गोल गोल फिरत आहे.

भावभक्ती आणि कृतिभक्ती ही मानवाच्या जीवन नौकेची दोन वल्ही आहेत. ही दोन्ही वल्ही चालवली, तर ती नाव पुढे जाईल. यातले एकच वल्हे चालवले आणि दुसरे चालवलेच नाही तर काय होईल ? नाव पुढे जाते आहे असे वाटेल, पण प्रत्यक्षात ती गोल गोल फिरेल! आपले जीवनही आज असे गोल गोल फिरत आहे.

आपल्याला ही दोन्ही वल्ही मारायला शिकायला हवे. भावभक्ती आणि कृतिभक्ती ही परस्परपूरक आहेत. भक्तीची बैठक ठेवून केलेल्या कृतीतून भाव खुलतो, भक्तिरस जागृत होतो. भावपूर्णता येते, भाव गतिमान झाला की, चित्त एकाग्र होते. त्यातून परत कृतीची प्रेरणा मिळते. हे दोन्ही करत करत हळूहळू चित्तशुद्धी होत जाते व माणूस परिपूर्ण बनतो.

भक्ती माणसामध्ये दोन शक्ती आहेत. क्रियाशक्ती आणि भावशक्ती या दोन्ही शक्ती सतत भोगासाठी वापरल्या जातात. या शक्तींमागे आपली भोगासक्ती काम करत असते. भोगासक्ती काय करते ? क्रियाशक्ती आणि भावशक्ती या दोहोंना मारून टाकते. शरीर आणि मन लवकर म्हातारे बनते. त्यावेळी कळते की , भोगा न भुक्ता वयमेव भुक्ता! मी भोग भोगतो आहे , या कल्पनेत जगत होतो ,पण भोग आहे तिथेच आहेत. मी मात्र त्या भोगांकडूनच भोगला गेलो !

माझ्या सगळ्या शक्ती त्यातून क्षीण झाल्या. क्रियाशक्ती आणि भावशक्ती यांच्यामागे आपण ' भोग ' ठेवला आहे. त्याऐवजी ' भक्ती ' ला ठेवले, तर या दोन्ही शक्ती वाढतात, जीवनात जोम आणि जोश येतो. म्हणूनच भक्तीची दोन अंगे आहेत. भावभक्ती आणि कृतिभक्ती आपल्या कृतीमागे भक्तीची बैठक आणून तशी कृती करणे ही कृतिभक्ती. क्रियाशक्तीला ही भक्ती चालना देते. आपले जीवन जो चालवतो , जो आपल्यावर निरपेक्ष प्रेम करतो , त्या देवाबद्दलचा भाव वाढवून त्यात मन एकाग्र करणे म्हणजे भावभक्ती. मुर्तीपूजा ही भावभक्ती आहे.  - ह. भ़. प सुखदेव धारेराव महाराज, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक