शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
2
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरची अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
3
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
4
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
5
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
8
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
9
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
10
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
11
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
12
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
13
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
14
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
15
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
16
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
17
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
20
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...

भक्त म्हणजे विभक्त नव्हे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 19:32 IST

भक्ती म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी नितांत समर्पण शील प्रेम. भक्त कधी देवा पासून वेगळा राहूच शकत नाही.

- हभप भरतबुवा रामदासी ( बीड )  

देवर्षी नारद महाराज भक्तीचे लक्षण सांगतांना म्हणाले; " नारदस्तु तद् अर्पिता अखिलाचारता तद् विस्मरणे परम व्याकुलता इति. ....! 

अखिल आचार भगवंताला अर्पण करणे म्हणजेच भक्ती. भक्ताचे आणखी एक लक्षण म्हणजे,  ' तद् विस्मरणे परम व्याकुळता. ..! भक्ताच्या अंतःकरणात भगवद् दर्शनाची तीव्र अभिलाषा असावी. ही व्याकुळता, आतुरता, अगतिकता, ओढ किती असावी. .? पाण्याबाहेर काढलेली मासोळी जशी पाण्यासाठी व्याकुळ होते ती व्याकुळता. एखादी अभिसारिका आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी किती अधीर होते ती अधीरता. भक्ताच्या ठिकाणी अशी अधीरता निर्माण झाल्याशिवाय सगुण साक्षात्कार शक्यच नाही. भक्ती म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी नितांत समर्पण शील प्रेम. भक्त कधी देवा पासून वेगळा राहूच शकत नाही. जो विभक्त रहातो तो भक्त नाही. समर्थ म्हणतात; 

भक्त म्हणजे विभक्त नव्हे!  विभक्त म्हणजे भक्त नव्हे! विचारेविण काहीच नव्हे! समाधान!!

मी भक्त ऐसे म्हणावे! आणि विभक्तपणेचि भजावे! हे अवघेचि जाणावे! विलक्षण!! 

भक्ती मार्ग सहज सुलभ असला तरी, त्यात संपूर्ण शरणागती, श्रद्धा, निष्ठा भाव, विश्वास, प्रेम, अनन्यता, अनासक्ती, व्याकुळता इ.लक्षणांचा अंतर्भाव असेल तरच भक्ती मार्गातून आत्मसाक्षात्कार घडतो. भक्तीच्या प्रांगणात कृष्ण दर्शनासाठी व्याकुळ झालेली राधा, गिरीधर गोपाळा साठी विष प्राशन करणारी मीरा, कालिमातेच्या दर्शनासाठी रात्रंदिन तळमळणारे रामकृष्ण परमहंस, 

भेटीलागी जीवा लागलीसे आस! पाहे रात्रंदिवस वाट तुझी. .. 

असे म्हणत देहूच्या डोंगरावर अगतिक झालेले तुकोबा, हीच मंडळी भक्ती मार्गातील सर्वोच्च आदर्श आहेत. साधक या अवस्थेला गेला तरच " भक्तीचेनि योगे देव! निश्चये पावतो मानव!! या समर्थ वचनाचा प्रत्यय येईल व भक्ती मार्गाच्या पंथातून मुक्तीचे द्वार खुले होईल.

 ( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्रमांक 9421344960 ) 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक