शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

परमेश्वराची प्राप्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 03:51 IST

परमेश्वराविषयी अतुट श्रद्धा, परमेश्वरी अस्तित्वाविषयी दृढ विश्वास आणि ज्ञानभारला विवेक याची साधक भक्ताला नितांत आवश्यकता आहे.

- वामनराव देशपांडेभगवंतांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनाला श्रद्धेय साधकांची मनोवृत्ती समजावून सांगताना एक अत्यंत महत्त्वाचा विचार दिला की, परमेश्वराविषयी अतुट श्रद्धा, परमेश्वरी अस्तित्वाविषयी दृढ विश्वास आणि ज्ञानभारला विवेक याची साधक भक्ताला नितांत आवश्यकता आहे. हे गुण साधकापाशी नसतील तर तो साधक नामसाधनेला आणि शुद्ध ज्ञानाच्या प्राप्तीला अपात्र ठरतो. विवेकहीन माणसाला भगवंत अस्तित्वसुद्धा जाणवत नाही, तर भगवंताची प्राप्ती कशी काय होणार-भगवंत अर्जुनाला अश्रद्धेय माणसांविषयी सांगतात की,अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति।नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मन: ।। गीता:४.४0।।‘पार्था, ज्याच्यापाशी कोणताही विवेक नाही, भगवंताविषयी कोणतीही श्रद्धा नाही, जो मूलत: संशयी वृत्तीचा आहे, त्याचा मानवी जन्म व्यर्थ आहे. प्रत्येक क्षणी त्याचे पतन होत असते. वैकुंठप्राप्ती अशा अश्रद्धेय माणसांना कधीच होत नाही. स्वर्गलोकीचे दुरूनही दर्शन घडत नाही. इतकेच काय, परंतु हा मृत्यूलोकही त्यांना हितकारक ठरत नाही. कुठल्याही प्रकारच्या सुखाचा, या संशयग्रस्त अश्रद्धेय जीवांना साधा स्पर्श होत नाही. याचे एकच महत्त्वाचे कारण म्हणजे मनात ठाण मांडून बसलेली ही संशयी वृत्ती, देहभावनेने जगणे, श्रद्धाविहिन कृती, विवेकाचा पूर्ण अभाव, मर्त्य विचार करण्याची पद्धती, त्यांना परमेश्वरी शक्तीची अजिबात ओढच निर्माण करीत नाही. भगवंत संपूर्ण जीवसृष्टीचे सुहृद म्हणजे अत्यंत प्रेमळ मित्र आहेत. सखा आहेत. जो भक्त परमेश्वराची प्राप्ती व्हावी म्हणून व्याकुळ होतो, त्या जीवाचा भगवंत सांभाळ करतो, त्याचा योगक्षेम परमेश्वरच सांभाळतो. त्याच्या जीवनाचा उद्धार होतो.अशा व्याकुळ परमभक्ताच्या मनात जर काही शंका निर्माण झाल्या, तर भगवंत स्वत: त्या शंकांचे निराकरण करतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हा जो व्याकुळ परमभक्त असतो ना, त्याच्या हातून एक चूक केवळ अज्ञान दाटून आल्यामुळे घडते, ती अशी की, तो जेवढे जाणतो, त्याच्या मर्यादित बुद्धीला जेवढे झेपेल तेवढेच सत्य आहे अशी त्याची समजूत होते. त्याचा अभिमान त्या साधक भक्ताला होतो. तो त्या भक्ताच्या पतनाचा क्षण ठरतो. म्हणून भगवंत स्वत: आपल्या भक्ताचे अज्ञान दूर करतो. भगवंत अर्जुनाला या अज्ञानमयी क्षणांच्या समाप्तीचा मार्ग सांगतात.तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञघनासिनात्मन:।छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ।।गीता:४:४२।।‘पार्था, केवळ अज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या, आपल्या अंत:करणात घट्ट रूतून बसलेल्या संशयाला, हातात आपण ज्ञानरूपी धारदार तलवार घेऊन, या अज्ञानाने माखलेल्या संशयाला नष्ट केले पाहिजे, तरच चित्तात समत्व नांदायला सुरुवात होईल. हाच सर्वोत्तम योग आहे. एकदा का चित्त स्थिर झाले की, तू युद्ध करायला सिद्ध होशील. पार्था, कर्मयोगी पुरुषच संशयात्मा नष्ट करू शकतो.’

टॅग्स :spiritualअध्यात्मिक