शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भक्त निवडरहित असतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 05:05 IST

भक्त ही अशी व्यक्ती आहे, जिला जीवनात स्वत:साठी काही राखून ठेवायचे नाहीये किंवा त्या व्यक्तीला जीवन उद्यासुद्धा जगायचे नाहीये. असा भक्त हा नेहमीच आजच्यापुरता म्हणजे वर्तमानात जगणारा असतो.

- सद्गुरु जग्गी वासुदेवभक्तीत कंजुषी नसते, याउलट तुम्ही उत्साहाने ओतप्रोत असता. तुमच्यातील सर्वकाही उत्साहाने सदैव ओसंडून वाहात असते. प्रत्येक क्षणी, तुमच्यातून जे काही ओसंडून वाहू शकते, ते ते सर्वकाही वाहत असते. मागे काहीच शिल्लक ठेवले जात नाही. ही समर्पित होणारी भावना आणि स्वत:पुरते काही न पाहता संपूर्णपणे वाहून घेणे, हीच सारी त्या भक्तीत मन:पूत उतरते. ती ज्याच्या ठायी असते, त्यालाच ‘भक्त’ असे म्हणतात. असा हा भक्त नेहमीच आपले आयुष्य शक्य तितक्या लवकर आणि शक्य तितके पूर्णपणे सद््गुरूसाठी, भक्तीसाठी वाहून देण्याच्या प्रयत्नात असतो. भक्त ही अशी व्यक्ती आहे, जिला जीवनात स्वत:साठी काही राखून ठेवायचे नाहीये किंवा त्या व्यक्तीला जीवन उद्यासुद्धा जगायचे नाहीये. असा भक्त हा नेहमीच आजच्यापुरता म्हणजे वर्तमानात जगणारा असतो. तो इतका परिपूर्ण असतो की, त्याला अन्य कुणाच्याही सहवासाची गरज भासत नाही किंवा इतर कुठल्याही गोष्टीची गरजसुद्धा विरून जाते. तो, त्याची भक्ती आणि ती ज्याच्यावर आहे, असे सारे एकरूप होऊन गेलेले असतात. त्यांच्यात भक्त आणि त्याची भावना या पलीकडे दुसरे विश्वच उरत नाही.त्याचे हे असे असणे, म्हणजे तो काही निरुपयोगी आहे म्हणून झालेले नसते, तर तो निवड-रहित झालेला आहे. ज्याचा उल्लेख आपण निर्गुण-निराकार असा करतो, तशीच काहीशी ही अवस्था म्हणायला हवी. भक्त आणि तो ज्याच्यावर भक्ती करतो, असे दोघेही परस्परांमध्ये पूर्णत: सामावले गेल्याचेच हे लक्षण आहे. जीवन जगण्यापासून निवडपूर्वक जीवन जगण्याइतपत ही मानवी उत्क्रांती आहे. तुम्ही माकडाच्या प्रक्रियेतून पार पडून मानव बनलात. जे जीवन, त्यातील बदल किंवा उत्क्रांती अनिवार्य होती, त्यात आता निवड आलेली आहे. म्हणजेच अनिवार्यतेकडून निवडीकडे जाणे ही उत्क्रांती असेल, तर निवडीकडून निवडरहित होऊन जगणे ही क्रांती म्हणायला हवी. अनिवार्य नव्हे, तर निवडरहित जीवन. हीच साक्षात्काराची मूक क्रांती आहे. निवडरहित जीवन ही भक्ताची नैसर्गिक स्थिती आहे. केवळ जेव्हा तुम्ही दु:खी-कष्टी असता, फक्त तेव्हाच तुम्हाला जीवनात निवड करावी लागते. जर तुम्ही पूर्णत: उत्साही असाल, तर तेव्हा त्या अवस्थेत जीवनात तुम्हाला कोणत्याही निवडीची गरजच कधी भासत नाही. जगण्याचा केवळ एकच मार्ग तुमच्यासमोर असतो आणि तो सदासर्वकाळ परिपूर्ण असतो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक