शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ऋण मोचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 04:06 IST

भारतीय संस्कृतीमध्ये चार प्रकारच्या ऋणांचे वर्णन आढळते. ब्रह्मऋण, देवऋण, ऋषीऋण व पितृऋण. ब्रह्म ही मूळ शक्ती आहे, ज्यामध्ये सृष्टीची उत्पत्ती झाली. ती पूर्णत: शुद्ध व निर्द्वंद्व आहे.

- डॉ. भूषण कुमार उपाध्याय

भारतीय संस्कृतीमध्ये चार प्रकारच्या ऋणांचे वर्णन आढळते. ब्रह्मऋण, देवऋण, ऋषीऋण व पितृऋण. ब्रह्म ही मूळ शक्ती आहे, ज्यामध्ये सृष्टीची उत्पत्ती झाली. ती पूर्णत: शुद्ध व निर्द्वंद्व आहे. म्हणूनच मानवाकडूनही अशी अपेक्षा केली जाते की त्याने स्वत:ला पूर्णत: शुद्ध व निर्द्वंद्व ठेवले पाहीजे व शेवटी त्या परमशक्तीमध्ये लीन झाले पाहीजे. जेव्हा लहान मूल जन्माला येते, तेव्हा ते पूर्णत: शुद्ध व निष्पक्ष असते. परंतु जसजसे ते मोठे होत जाते तसतसे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे विकार निर्माण होत जातात. तो कुठल्यातरी विशेष वर्ग किंवा सिद्धांताशी जोडला जातो. म्हणूनच प्रत्येक मानवावर हे ऋण असते की त्याने आपले मन शुद्ध व निष्पक्ष ठेवले पाहिजे. या विश्वातील प्रत्येकच धर्म मानवाला या दिशेने चालण्याची प्रेरणा देतो व अनेक विधीसुद्धा सांगतो.ब्रह्मऋणानंतर देवऋणाचे स्थान आहे. देव निसर्गातील वेगवेगळया शक्तीचे प्रतिनिधित्व करतात, जसे की ते ऊन, थंडी, पाऊस व विश्वातील इतर गतिविधींचे संचालन करतात. या शक्ती चांगले काम कशा करतील, यासाठी मानवाने या शक्तींना चालना देण्याचे कार्य करायला पाहिजे. पर्यावरणाची सुरक्षा असो वा निसर्गातील अनेक अनुकूल गोष्टींना चालना देण्यासाठी मानवाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.देवऋणानंतर ऋषीऋणाचे स्थान आहे. आपल्या ऋषी, मुनींनी आपले ज्ञान व विज्ञानाद्वारे या विश्वाला समृद्ध केले आहे. या आधुनिक जीवनात जे काही विकसित झाले आहे, ते ऋषी, मुनी, वैज्ञानिक, नेता, समाजशास्त्रज्ञ इ. च्या ज्ञानाचे फलित आहे.सर्वात शेवटी ज्या ऋणाचे वर्णन पाहायला मिळते, ते म्हणजे पितृऋण. आपल्याला माता-पित्यांकडून जन्म मिळतो. आपले सर्व संस्कार, जीवन जगण्याची कला मूलत: आपण आपल्या आई-वडिलांकडून शिकत असतो.अशाप्रकारे आपले संपूर्ण जीवन या चार प्रकारच्या ऋणांवर आधारित आहे. या ऋणांची परतफेड करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. परंतु आपले व्यस्त जीवन, स्वार्थ व षड्दोषांच्या अस्तित्वामुळे मानव या ऋणांना पूर्णत: विसरलेला आहे. यामुळे मानवाचे व्यक्तिगत, सामाजिक व राष्ट्रीय जीवन अत्यंत कष्टमय झालेले आहे. शेवटी आपण आत्मशुद्धीद्वारे ब्रह्मऋण, पर्यावरणाच्या उपासनेद्वारे देवऋण, ज्ञान-विज्ञानाच्या अर्जनाद्वारे ऋषीऋण व माता-पित्यांच्या सेवेद्वारे पितृऋण फेडून सफल किंवा पूर्ण जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकतो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक