शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

रमजान प्रेषितांचा प्रिय महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 14:33 IST

रमजान हा इस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यांपैकी एक अतिशय महत्त्वाचा असा महिना असून या महिन्याला इस्लाम धर्मात ...

ठळक मुद्देरमजान हा इस्लाम धर्मातील पवित्र महिनावर्षातील बारा महिन्यांपैकी एक अतिशय महत्त्वाचा असा महिनाया महिन्याला इस्लाम धर्मात फार महत्त्व दिले गेलेले आहे

रमजान हा इस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यांपैकी एक अतिशय महत्त्वाचा असा महिना असून या महिन्याला इस्लाम धर्मात फार महत्त्व दिले गेलेले आहे. रमजान हा महिना फारच उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद सल्ललाहु अलैही वसल्लम यांचा सर्वात प्रिय महिना म्हणून रमजान महिना ओळखला जातो.

- इस्लामिक महिने चांद्रिक काल गणनेवर आधारित असल्याने अन्य महिन्यांच्या सुरुवातीप्रमाणेच या महिन्याची सुरुवात देखील चंद्रदर्शनाने होते. चंद्रदर्शन ज्या दिवशी होते त्याच्या दुसºया दिवसापासून रमजान महिना सुरू झाल्याचे द्योतक आहे म्हणूनच मुस्लीम बांधव रोजा (उपवास) करतात. या दिवसापासून जन्नत (स्वर्ग) चे दार उघडले जाते व जहन्नम (नरक) चे दार बंद केले जात आणि त्यानंतर सूचना होते की, ज्या लोकांना पुण्य हवे आहे त्यांनी पुढे व्हावे आणि जे लोक वाईट कृत्य करणारे आहेत त्यांनी त्यापासून लांब थांबावे.

कुरआन मानव जातीला मार्गदर्शक ग्रंथ

  • - इस्लाम धर्माचा सर्व श्रेष्ठ धर्मग्रंथ, प्रेषित हजरत मोहम्मद सल्ललाहु अलैहि व सल्लम यांच्यावर अल्लाहकडून उतरलेला आसमानी संदेश, कुरआन हा धर्मग्रंथ होय. जो समस्त मानव जातीला अनुसरून मार्गदर्शक आहे. रमजान महिन्याच्या पवित्र कद्रच्या रात्री हा ग्रंथ अवतरित झाला.
  • - रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले- मानव जातीकरिता मार्गदर्शक व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. (दिव्य कुरआन २:१८५)
  • - जो संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे तोच या ग्रंथाला अवतरित करणारा आहे. या पवित्र धर्मग्रंथाची विभागणी ३० खंड, ११४ अध्यायामध्ये करण्यात आली आहे. यात ६००० पेक्षाही जास्त आयती आणि विशेष म्हणजे १००० पेक्षा जास्त आयती आधुनिक विज्ञानाशी निगडित आहेत.
  • - कुरआन हा पवित्र ग्रंथ असून तो कयामत (अंतिम निवाड्याचा दिवस) पर्यंत हयात आणि कायम राहणार आहे, ज्यात प्रलयापर्यंत फेरफार शक्य नाही. पृथ्वीच्या आतापर्यंत सर्व लोकांना मार्गदर्शन आहे. या पवित्र ग्रंथाच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वत: अल्लाहने स्वीकारलेली आहे व याच प्रमुख कारणामुळे आज चौदाशे - साडेचौदाशे वर्षे लोटली तरी या पवित्र ग्रंथाच्या काना-मात्र्यात कोणताही बदल झालेला नाही. आणि ईन्शाअल्लाह कयामतपर्यंत होणारही नाही.
टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकRamzan Eidरमजान ईदRamzanरमजान