शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाची सृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 18:18 IST

आपल्या समोर वाढलेल्या जेवणाच्या पानात मीठ आणि लोणचे हे पदार्थ अल्पप्रमाणात वाढलेले असतात. ते त्याच प्रमाणात स्वीकारल्यामुळे ताटातील गर्दी न वाढविता खाल्ल्यानंतर आपल्या जेवणाची रुची वाढवितात.

ठळक मुद्दे तुकोबारायांनी वापरलेला ‘निमाले’ हा शब्द आपण आपल्या जीवनात अंगीकारून मर्यादित भोगांचा स्वीकार करूया व आपण आनंदी बनून आपली सृष्टीही आनंदी बनवूया. आनंद तरंग

इंद्रजित देशमुख-आज वर्तमानात प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी, पण न मिळणारी गोष्ट म्हणजे आनंद. तसं पाहिलं तर आनंद ही एक अवस्था आहे. आपल्या प्रयत्नानंतर प्राप्त होणारी. प्रत्येकाला ज्ञात-अज्ञातपणे ती अवस्था हवी आहे; पण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या योग्य प्रयत्नांचा प्रकार व दिशा यांची माहिती नसल्यामुळे सगळ्यांनाच ती आनंदानुभूती घेता येत नाही. याच अनुभूतीच्या योग्य व सूत्रबद्ध दिशेचा उल्लेख आमचे तुकोबाराय आपल्या एका अभंगात करताना म्हणतात,‘काम, क्रोध, लोभ निमाले ठायीची।अवघी आनंदाची सृष्टी झाली।।’जीवनात भरभरून आनंद यावा यासाठी तुकोबाराय जो मार्ग सांगत आहेत, त्या मार्गाचा अवलंब केला की स्वत: त्या आनंदाची अनुभूती घेता येतेच; पण आपल्या अस्तित्वाने आपला भोवतालदेखील त्याच आनंद तरंगांनी कंपित करता येतो व त्यामुळे जणू ही अवघी सृष्टीच आनंदी भासू लागते. त्यासाठी काय करावं लागत असेल तर फक्त जीवनातील नियमन वाढवायचं. वास्तविक जीवनात विकार आणि विकारविषयक भोग यांच्या बाबतीत ब-याचदा आपली अपरिहार्यता किंवा नाइलाज असतो, अशा वेळी जीवनातील त्या विकाराचा पूर्णपणे त्याग करता येत नाही. आपल्या समोर वाढलेल्या जेवणाच्या पानात मीठ आणि लोणचे हे पदार्थ अल्पप्रमाणात वाढलेले असतात. ते त्याच प्रमाणात स्वीकारल्यामुळे ताटातील गर्दी न वाढविता खाल्ल्यानंतर आपल्या जेवणाची रुची वाढवितात. तुकोबारायांनी वापरलेला ‘निमाले’ हा शब्द आपण आपल्या जीवनात अंगीकारून मर्यादित भोगांचा स्वीकार करूया व आपण आनंदी बनून आपली सृष्टीही आनंदी बनवूया.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर