शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

पहिली कला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 05:43 IST

अध्यात्माच्या आठ कला आहेत. त्यापैकी पहिली कला ही संवादाची आहे. संवाद ही अशी कला आहे, जी मानवाला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकते.

- विजयराज बोधनकरअध्यात्माच्या आठ कला आहेत. त्यापैकी पहिली कला ही संवादाची आहे. संवाद ही अशी कला आहे, जी मानवाला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकते. शब्द सुर हा निसर्गाने मानवाला दिलेला मोठा आशीर्वाद आहे. अक्षरज्ञान हे मानवाला मिळालेले एक वरदान आहे. ज्याला अक्षरज्ञान झाले, तो शब्दांवर प्रभुत्व मिळवू शकतो. जो विचार करून बोलतो तो विचारवंत ठरतो. जो बोलून विचारात पडतो तो हळूहळू जगाला आणि स्वत:ला अप्रिय वाटत राहतो. तारतम्य नावाची एक जाणीव असते. ती जाणीवसुद्धा एक प्रकारची आध्यात्मिक शक्तीच आहे. तुमच्या उत्तम बोलण्याची जाणीव समोरच्या व्यक्तीला झाली की, उत्तम समाज आपोआप त्या व्यक्तीशी जोडला जातो. उत्तम बोलण्याची कला ही आत्मसात करावी लागते. त्यासाठी फक्त रसाळ वाणी असून चालत नाही, तर जागतिक ज्ञान आणि वेगळा विचार करण्याची ऊर्जाही असली पाहिजे. मेंदूतून उत्पन्न होणारे विचार धन-मनाच्या एकाग्रतेवर अवलंबून असतात. मन स्थिर असेल तरच मेंदूच्या ऊर्जाक्षेत्रातून नवा विचार प्रकटू शकतो आणि त्याच नव्या विचारांची मांडणी जगासमोर मांडताना उत्तम संवादाची कला त्या बोलणाऱ्या व्यक्तीला यश प्राप्त करून देऊ शकते. अनेकांना साधे बोलणेही न जमण्याचे कारण म्हणजे ते बोलण्याचा सराव करीत नाहीत. कुठलीही गोष्ट पहिली आत्मचिंतनाच्या पायरीवरून प्रवास करती झाली की तिला मेंदूचा भक्कम आधार मिळतो. मेंदूच्या कपाटात एखादी गोष्ट घर करून बसली की, ती डळमळीत होण्याची भीती नसते. बोलण्याचा सराव मेंदूच्या माध्यमातून केला तर चंचल मनही स्थिर होऊ शकते. उत्तम बोलण्याच्या कलेतून प्रगतीचे अनेक मार्ग मोकळे होतात. जागतिक वैचारिक बळ वाढत जाते. माणूस बोलण्याच्या कलेमुळे अधिक प्रगल्भ होत जातो. माणसे जिंकण्यासाठी गोड शब्द पुरेसा असतो. एकदा का केवळ बोलण्यातून जग जिंकता आले की, मग ईश्वरी शक्ती आपल्या सोबत असते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक