शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

समाधानी मन पुरविते वैचारिक खाद्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 07:21 IST

ज्यांनी सर्व इंद्रियांना शांतीचे अलंकार घातले आहेत, ज्यांचे चित्त सर्वव्यापक आहे, ज्यांच्या चांगल्या वासनेत धर्म राज्य करतो, ज्यांनी ज्ञानरूपी गंगेत स्नान केले आहे

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

ज्यांनी सर्व इंद्रियांना शांतीचे अलंकार घातले आहेत, ज्यांचे चित्त सर्वव्यापक आहे, ज्यांच्या चांगल्या वासनेत धर्म राज्य करतो, ज्यांनी ज्ञानरूपी गंगेत स्नान केले आहे, जे पूर्णत: तृप्त होऊन जीवन जगतात त्यांचे मन केवळ एक उपास्य व दुसरा उपासक असा भेदभाव करत नाही. थोडक्यात दुजेपणा त्यांच्या मनाला शिवत नाही. अशा व्यक्तींचे मन समाधानी असते. समाधानी मन जीवनात वैचारिक खाद्य पुरवित असते. म्हणून म्हणतात, समाधानी मन शांतीचे दैवत असते. कारण तेथे सात्त्विकतेचे मळे असतात. त्या मळ्यात ब्रह्मानंदरूपी फळे आलेली असतात. ते फळेच मोक्षाची वाट दाखवतात. कारण त्यांच्याकडे द्वेषरुपी तण राहत नाही. आसुरी प्रकृतीवर त्यांनी विजय मिळविलेला असतो. तमोगुणाला हद्दपार केलेले असते. त्यांच्या मनात भ्रांतीच्या कल्पना नसतात. वाचा व्यर्थ शिणवत नसतात. त्यांचे मन अथांग सागरासारखे असते. त्यांची भक्ती एकविध असते. आपल्या उपास्य दैवताला ते प्रेमाने भजतात आणि शेवटी आपण व उपास्य दैवत वेगळे नाही याची परिपूर्ण जाणीव त्यांना होते. ज्यांच्या कर्माचरणामध्ये सहज नीती सापडत असते असे जे व्यापक अनुभवाचे पुष्प आहेत ते दैव प्रकृतीचे पुष्प जाणले पाहिजे. कारण त्यांचे ‘मन’ मीच होऊन माझी सेवा करण्यात गुंतलेले असते. म्हणजे शुद्ध मनरुपी गंगेत न्हाणे होय. मन शुद्ध झाले की चित्त स्थिर होते. चित्त स्थिर झाले की, अज्ञानरुपी अंध:कार नाहीसा होतो. मग आत्मज्ञानरुपी प्रकाशातच जगता येते. त्याचा आनंद घेता येतो. आत्मसुखात ओले चिंब होता येते. सर्व इंद्रियांवर शांतीचे अलंकार धारण करता येतात. इंद्रियांवर ताबा मिळवता येतो. आत्मरुपाशी एकरूप होता येते. स्वरुपस्थितीला जाणता येते. असे दुर्लभ लोक असतात तेच या स्थितीला पोहोचतात. यासाठी आपल्या मनात समरसतेचा अनुभव करता आला पाहिजे. त्यांच्या जीवनात ही स्थिती प्राप्त झालेली असते. त्याचे कारण त्यांचे तृप्त व स्थिर मन होय.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक