शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
3
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
4
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
5
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
6
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
7
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
8
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
9
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
10
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
11
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
12
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
13
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
14
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
15
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
16
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
17
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
18
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
19
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
20
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन

बालकरूपे विष्णू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:20 IST

कंसाची खात्री पटली, की माझे प्राण हरण करणाऱ्या विष्णूने हिच्या गर्भात प्रवेश केला आहे.

- शैलजा शेवडेदेवकीच्या उदरात आठवा गर्भ स्थापित झाला. श्रीभगवान तेजरूपाने त्या गर्भात विराजमान झाले. देवकीच्या शरीरकांतीने बंदीगृह झगमगायला लागले. देवकी विलक्षण तेजस्वी दिसू लागली. कंसाची खात्री पटली, की माझे प्राण हरण करणाऱ्या विष्णूने हिच्या गर्भात प्रवेश केला आहे. भगवंताप्रति दृढ वैरभाव धरून तो त्याच्या जन्माची प्रतीक्षा करू लागला. उठता-बसता, खाता-पिता, चालता-फिरता सर्वदा विष्णूचे चिंतन करू लागला. सारे जगच त्याला विष्णुमय दिसू लागले. जसा श्रीविष्णूचा प्रगट होण्याचा काळ समीप आला, तसे सर्व देव कंसाच्या बंदीगृहात आले आणि श्रीहरीची स्तुती करू लागले. ही स्तुती गर्भस्तुती म्हणून प्रसिद्ध आहे. आता भगवंताच्या प्रत्यक्ष आविर्भावाची वेळ येऊन ठेपली. त्याचे वर्णन मी काव्यात केले आहे.

मंगलमय दशदिशा तारका, मंगल युती करती,परम शुभमुहूर्त पातला, हेच जणू सांगती,पूर्व दिशेला, जणू पूर्ण चंद्र ये, अंधा-या रात्री,बालकरूपे, विष्णु प्रगटला, देवकीच्या पोटी।स्तंभित ते वसुदेव देवकी, मनोमनी हर्षती,रूप सावळे, अद्भुत सुंदर, पुन्हा पुन्हा पाहती,निघून गेले, भय ते सारे, नतमस्तक होती,बालकरूपे, विष्णु प्रगटला, देवकीच्या पोटी।चतुर्भुज चतुरायुध, पीतांबरधारी मूर्ती,जलभरल्या मेघासम त्याची, तेजस्वी कांती,किरीटकुंडले, रत्नप्रभेने, कुंतल ते झळकती,बालकरूपे, विष्णु प्रगटला, देवकीच्या पोटी।प्रफुल्लीत वसुदेव सोडतो, संकल्प मनी ते किती,विष्णुचा अवतार उत्सव, नक्कीच त्यांच्या प्रति,हात जोडूनी, परमात्म्याचे स्तवन ते करती,धन्य धन्य हो, बाळरूपाने, आलांत, जगजेठी।वासुदेव देवकीचे हृदय आनंदाने भरून आले. ते नतमस्तक होऊन परमात्म्याची स्तुती करू लागले.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक