शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बदलती मनोवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 09:33 IST

मनाची अवस्था सतत बदलत राहणे हीच त्याची मूळ भूमिका असते. कारण ‘मन’ स्थिर राहूच शकत नाही.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजमुलगा वर्षभर अभ्यास करतो. पण परीक्षा जवळ आल्या की मानसिक ताण घेतो. स्वत:चा स्वत:वर विश्वास नसला की, अशी मनोवस्था होते. अभ्यास हा आत्मविश्वासाने केला पाहिजे. मनापासून केला पाहिजे. स्मरणात ठेवला पाहिजे. मनावर घेऊन केलेल्या अभ्यासात आपली प्रगती दिसते. अभ्यासात ‘मन’ लागत नाही, अशा काही मुलांच्या तक्रारी असतात. काही मुले मन लावून अभ्यास करतात. यात ज्याच्या - त्याच्या बुद्धीनुसार, बुद्ध्यांकावरून त्यांची मनोवस्था बदलत जाते. मनावर घेऊन अभ्यास केल्यास बुद्ध्यांक उंचावतो. मनाला प्रसन्न ठेवणे अवघड काम आहे. पण प्रसन्न मनाने केलेला अभ्यास लक्षात राहतो. परीक्षा म्हटले की ताण येतोच! कारण ती परीक्षाच असते. इथे सतत जागृत अवस्थेत राहणे महत्त्वाचे असते. जागृत ‘मन’ आपल्या सवयींना बदलवते. मनाची अवस्था सतत बदलत राहणे हीच त्याची मूळ भूमिका असते. कारण ‘मन’ स्थिर राहूच शकत नाही. कारण त्याचे स्थिरपण फक्त ईशचरण एवढेच असते. म्हणून तर संत तुकाराम महाराजांनी सांगितले. ‘‘आता कोठे धावे मना तुमचे चरण देखलिया’’ ‘मन’ एकदा त्या ईश्वराच्या चरणाशी रत झाले की मग कुठेही धाव घेत नाही. तोेपर्यंत ते मन कुणाच्या आज्ञेत राहत नाही. मनाचे मालक मनच असते. कारण मनाला शक्ती बुद्धी देते. बुद्धीचा आत्मा. आत्म्याचे औदार्य मनावरच अवलंबून असते. मनाचे सुंदरपण त्या आत्मस्थितीवर निर्भर असते.आत्म्याची स्थिती जशी असते, त्यानुसार मनाचे भाव बदलत जातात. परीक्षेला जाणारा मुलगा - सासरला जाणारी नववधू (मुलगी), यांचे भाव जवळपास सारखे असतात. इकडे परीक्षेला जाणाऱ्या मुलांचा पेपर छान गेला की भाव बदलतात. परीक्षेला जाण्यापूर्वीचे मन अन् नंतर पेपर छान गेल्यानंतरचे मन यात फरक आहे. तसेच सासरला जाण्यापूर्वीचे ‘मन’ अन् सासरला गेल्यास सासरच्या लोकांचे प्रेमाने भारावून गेलेले मन यात नक्कीच फरक असतो. मनाला नेहमी चांगले विचार करण्याची सवय लावा. ‘मन’ सुख-दु:खात बदलते. मनाची मनोवस्था ही बदलत जाणारी आहे. म्हणून संतांनीसुद्धा ‘मनालाच’ मोठेपण दिले आहे. मन गुरु, मन शिष्य, सर्वस्व ‘मना’वरच अवलंबून आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक