शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

विकत घेतला श्याम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 3:04 AM

साहित्य निर्मितीसाठी प्रतिभा आवश्यक आहे. परंतु प्रतिभेने निर्माण केलेल्या साहित्यावर अनुभूतीचे संस्कार व्हावे लागतात. सृजनशक्ती आणि विचारशक्ती ही आपल्या पूर्वीच्या प्रतिभावंतांच्या, राष्ट्रप्रभूंच्या किंवा विचारवंतांच्याही प्रभावानेच वाटचाल करीत असते.

- डॉ. रामचंद्र देखणेसाहित्य निर्मितीसाठी प्रतिभा आवश्यक आहे. परंतु प्रतिभेने निर्माण केलेल्या साहित्यावर अनुभूतीचे संस्कार व्हावे लागतात. सृजनशक्ती आणि विचारशक्ती ही आपल्या पूर्वीच्या प्रतिभावंतांच्या, राष्ट्रप्रभूंच्या किंवा विचारवंतांच्याही प्रभावानेच वाटचाल करीत असते. काहींच्या शब्दांवर कुणाचा तरी प्रभाव असतो. कुणीतरी कुणाच्या तरी विचाराने प्रभावित होऊन आपले विचार मांडत असतात. एखादी निर्मितीदेखील पूर्णत: स्वयंभू आहे, असे वाटते. काही वेळा एखादी मूळ शब्दकृतीच पुन्हा नवे रूप घेऊन नव्या रूपाने स्वयंभू होऊन प्रकटते. अशी गमतीशीर उदाहरणे प्रतिभावंतांच्या जीवनात घडत असतात. प्रसिद्ध कवी ग. दि. माडगूळकर यांनी ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटासाठीनाही खरचली कवडी दमडी ।नाही वेचिला दाम ।बाई मी विकत घेतला श्याम ।।ही अतिशय सुंदर रचना लिहिली. ते गाणे आजही गुणगुणत राहावेसे वाटते. शब्दांची मधुरता आणि कल्पनेची सुरेखता गदिमांनी प्रत्येक चरणामध्ये ओतली आहे. हे गाणे मीराबार्इंच्या एका सुंदर हिंदी अभंगावरून सुचले आहे, हे गदिमांनी मान्य केले होते आणि संगीतकार सुधीर फडके यांनीही याच्या पाठीशी असलेल्या मीराबार्इंच्या रचनेचे मोठेपण सांगितले होते. संत मीराबार्इंची गौळणसदृश एक रचना आहे-‘माई मैं ने गोविंद लीन्हो मोल ।कोई कहे हलका, कोई कहे भारीलियो तराजू तोल।।मी तराजू मांडून गोविंदाला तोलून त्याचे मोल देऊन त्याला घेतलंय. ‘कोई कहे अनमोल’ असे हे गोविंदधन मला सहजासहजी मिळालेले नाही. मीराबार्इंची हीच संकल्पना गदिमा त्या गीतातून विस्तारतात आणि जन्मभराच्या श्वासाइतके हरिनाम मोजून मी त्याला विकत घेतलाय, असे सांगतात. प्रतिभावंतांच्या रचनांमध्ये समानता असते. कल्पना विस्ताराचे आणि कल्पकतेचे सौंदर्य असते; पण ते शब्दसौंदर्यही संतरचनेच्या प्रासादिक अभंगवाणीला समोर ठेवून जेव्हा अभिव्यक्त होते तेव्हा कविता आणि गीतही संतवाणीच्या अवस्थेला जाऊन पोहोचते.गदिमांचा संतसाहित्याचा व्यासंग, अभ्यास आणि वाचन किती सूक्ष्म होते हे सांगायला नको. ‘गोविंद लीन्हो मोल’ आणि ‘विकत घेतला श्याम’ या दोन्ही रचना पाहिल्यावर मीराबार्इंचे भजन गदिमांच्या शब्दाने पुन्हा प्रकटते आणि दोन्ही रचनांमधून नामसंकीर्तन उभे राहते. तसेच गदिमांच्या प्रासादिक प्रतिमेचे उत्तुंग दर्शन घडते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक