शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

अविद्येचा मळ गेल्याशिवाय देहास पावित्र्य प्राप्त होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 18:58 IST

तोपर्यंत कितीही गंगा स्नान केले तरी काय उपयोग?

- हभप भरतबुवा रामदासी, बीड

संतांचे वर्णन करतांना शास्त्रकार म्हणतात, त्यांच्या ठिकाणी शुचित्व आहे, दातृत्व आहे, मातेची ममता आहे. महत्प्रयासाने प्राप्त झालेल्या नरदेहाचे सार्थक व्हावे ही तळमळ आहे. संत अवतीर्ण होतात ते जड जीवाच्या कल्याणासाठी. येथे उपकारासाठी! आले घर ज्या वैकुंठी  !!मनुष्य संसारात जन्माला आला की त्याच्या ठिकाणी देह तादात्म्य निर्माण होते.  मी देह आहे, या स्फुरणामुळेच अपवित्रपणा निर्माण होतो. मी देह आहे, या अविद्येचा नाश होऊन मी ब्रह्म आहे, या स्वरूप स्थितीची जाणीव झाली की देह शुद्ध झाला. संत म्हणतात; देह शुद्ध करोनी ! भजनी भजावे !!आणिकाचे नाठवावे गुण दोष!!संतांच्या संदर्भात संताचा देह पवित्र का. .? तर देह म्हणजेच मी, व मी ब्रह्म आहे, हा त्यांचा अभिमान गळून पडलेला असतो. देहाचा ही अभिमान नाही व ब्रह्मास्मिचा ही अभिमान नाही. फक्त संत निरंजन स्थितीत जगत असतात. म्हणून तर त्यांच्या ठिकाणी शुचित्व येते. विद्या अविद्या या दोन्ही उपाधीचा त्याग करून निरंजन स्थितीला ते प्राप्त झालेले असतात. तुकाराम महाराज म्हणतातउपाधी वेगळे तुम्ही निर्विकार ! काहीच आकार तुम्हा नाही  !!अशा स्थितीला संत प्राप्त झालेले असतात. त्या मुळेच मिथ्या अभिमानी जीवाला शुचित्व देण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असते. गंगेलाही पवित्र करण्याची अद्भूत शक्ती संताच्या जवळ असते. संत म्हणजे प्रत्यक्ष तीर्थच. अहो....इतकच काय. .तीर्थाचेही तीर्थ म्हणजे संत  होय. माउली म्हणतात; जयाचे नाव तीर्थरावो ! दर्शने प्रशस्तीसी ठावो  !!लौकिक गंगेत स्नान करून देह पवित्र होईलही. ..पण पाप करण्याची बुद्धी नष्ट होईलच, असे नाही. अविद्येचा मळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत कितीही वेळा गंगा स्नान केले तरी काय उपयोग. .? संत दर्शनाने तर विद्या आणि अविद्या या दोन्ही मळाचा नाश होतो.  नुसत्या कृपा आशिर्वादाने संत साधकाला संतच करतात. तुकाराम महाराज म्हणतात;  आपणासारखे करिती तात्काळ! नाही काळ वेळ तयालागी !!आज चंगळवादाच्या बाजारात असे शुचित्व असणारे संत मिळणे अवघड आहे. आज तर अध्यात्म क्षेत्राचाही बाजार भरला जात आहे. समाजाला ही विवेकाची भान राहिले नाही. वरवरच्या भपकेपणाला भुलून आज माणसे नको त्याच्या नादी लागतात. अर्थात आज आत्मज्ञान तरी कुणाला हवे आहे. ..? ज्याला त्याला प्रापंचिक अडचणीतून मुक्त करणारे, जादुटोणा चमत्कार करणारे, नोकरी लाऊन देणारे, लग्न जमविणारे, लॉकेट अंगठ्या हवेतून काढून देणारे व भरपूर पैसा लुटणारे महाराज समाजाला हवे आहेत. समाज अशाच महाराजांच्या शोधात असतो 

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क क्र. 8329878467 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक