शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

इस्लाम धर्मामध्ये देवाच्या एकत्वावर श्रद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 15:42 IST

रमजान ईद विशेष...!

इस्लाम धर्मामध्ये देवाच्या एकत्वावर श्रद्धा आहे. या धर्माला कोणीही संस्थापक नाही. कारण या धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या अधिष्ठानात ईश्वराला खूप महत्त्व आहे. ईश्वराने जगाची निर्मिती केल्यानंतर त्याच्या नियमनाचे तत्त्वज्ञान त्याने अनेक प्रेषितांकरवी मानवी समूहापर्यंत पाठविले. त्या तत्त्वज्ञानाला ईश्वरीय धर्म मानले जाते. ईश्वराने अशा तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी अनेक प्रेषितांची मानवी समाजातून निवड केली. त्यापैकी हजरत मुहम्मद (स.) हे एक आहेत.

इस्लामने ईश्वराकडून नियुक्त केलेल्या प्रेषितांची संख्या १ लाख २४ हजार इतकी सांगितली आहे. प्रेषित मोहम्मद (स.) यांच्यापूर्वी ईश्वराने ज्यांना प्रेषित म्हणून निवडले होते, त्यांची नियुक्ती ही त्यांचा देश अथवा समाजापर्यंत मर्यादित होती. ईश्वराने प्रेषित नियुक्त करण्याचा इतिहास पृथ्वीच्या निर्मितीपासून सांगितला जातो. या परंपरेत हजरत आदम (अ.) यांचा प्रथम क्रमांक लागतो तर मोहम्मद (स.) यांचा अखेरचा क्रमांक आहे. ईश्वराने पाठविलेल्या प्रेषितांच्यानंतर त्यांच्या माध्यमातून आलेल्या तत्त्वज्ञानात मानवी समाजाने अनेक बदल करण्यात आले.

कालांतराने काही प्रेषितांच्या समाजातच एकेश्वरवादाला तिलांजली देण्यात आली. त्यामुळे र्ईश्वराने त्याच्याकडून आलेल्या मानवी समाजाच्या हितासाठी असणाºया तत्त्वज्ञानाच्या पुनर्जागरणासाठी प्रेषित मोहम्मद (स.) यांची निवड केली. त्यांनी इ.स. ६१० साली सौदी अरेबियाच्या मक्का या शहरात ईश्वरीय धर्म असणाºया इस्लामच्या पुनर्जागरणाची सुरुवात केली. इस्लामच्या अनुयायांना किंवा त्या धर्माचे पालन करणाºया लोकांना मुसलमान म्हटले जाते. प्रत्येक धर्माची काही मूलतत्त्वे असतात. त्याप्रमाणे इस्लामचीदेखील काही मूलतत्त्वे आहेत. इस्लाम धर्माचा अंगीकार करण्यासाठी अल्लाहवर आणि हजरत मोहम्मद (स.) हे अखेरचे प्रेषित असण्यावर श्रध्दा असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कलमा धारण केला पाहिजे.

मुसलमान होण्यासाठी त्याने जो कलमा धारण करावयाचा आहे, त्याचे अरबी शब्द असे आहेत ‘ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल-अल्लाह’ (एकच ईश्वर असून, कोणीही त्यापेक्षा वरचढ नाही. मुहम्मद हे अल्लाहचे शेवटचे प्रेषित आहेत.) इस्लाम स्वीकारणाºया व्यक्तीने इस्लामी तत्त्वज्ञानाच्या संहितेचे पालन करणे महत्त्वाचे आहे. इस्लामी तत्त्वज्ञान कुरआन आणि प्रेषितांच्या वचनातून निर्माण झाले आहे.

हदिस व कुरआन हेच इस्लामी तत्त्वज्ञानाचे मुख्य आणि अंतिम स्त्रोत आहेत. त्यापैकी कुरआन हा ईश्वरी ग्रंथ आहे तर हदिस ही प्रेषितांची वचने आहेत. कुरआनचा लेखक कोणी व्यक्ती नाही तर ते र्ईश्वराकडून अवतरलेले ईश्वरी संदेश आहे. ते अरबी भाषेत अवतरले आहे. कुरआनची रचना इतर ग्रंथांपेक्षा वेगळी आहे. ते काही सूरहमध्ये विभागले आहे. सूरह याचा शब्दश: अर्थ ‘कुंपणाने घेरलेली जागा’असा होतो. कुरआनची रचना एकूण ११४ सूरहमध्ये करण्यात आली आहे. कुरआनच्या सूरहचेदेखील दोन प्रकार आहेत. त्याला मक्की व मदीनी म्हटले जाते. हजरत मोहम्मद (स.) यांच्या मदिनेकडील प्रस्थानाअगोदर अवतीर्ण झालेल्या सूरहना मक्की म्हणजे मक्का येथील वास्तव्यात अवतरलेले सूरह आणि त्यानंतरच्या सूरहना मदीनी असे म्हणतात. कुरआनमधील श्लोकास आयत असे म्हणतात. आयत या शब्दाचा अर्थ चिन्ह असा होतो.- आसिफ इक्बाल

टॅग्स :SolapurसोलापूरRamadanरमजानAdhyatmikआध्यात्मिक