शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

उपाधी मानिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 06:40 IST

अहं म्हणणारा जेव्हा ‘दासोहं’ म्हणतो तेव्हा त्याला आनंदाचा गर्व असतो. असं लहानपण संत तुकोबाही देवाला मागतात.

- बा.भो. शास्त्री

उपाधी हा शब्द, धा, धातूला उप व आ हे दोन उपसर्ग लागून तयार झालेला शब्द आहे. उप म्हणजे जवळ. आ म्हणजे पर्यंत. धातूला की प्रत्यय लागला, धा चा धी झाला. धी म्हणजे बुद्धी किंवा प्रतिष्ठा म्हणजे बुद्धीचा किंवा प्रतिष्ठेजवळ पोहोचलेला. उपाधीमंत म्हणजे बुद्धिमंत किंवा प्रतिष्ठित हाच सूत्राचा आशय आहे. ज्यात सकारात्मक गुणांचा स्वीकार व नकारात्मक ऊर्जेचा अभाव असतो. त्याला जाणते उपाधी देऊन सन्मानित करतात. उपाधीधारक त्या पदाला प्राप्त झाला असं समजावं. ओघानेच ती व्यक्ती आदर व सन्मानाला तर पात्र होतेच. पण आपणही हिमालय पर्वताच्या पायथ्याजवळ बसल्याचा आनंद अनुभवत असतो. दिव्यात्वापुढे नतमस्तक होणं हीच खरी आपली संस्कृती आहे. जे जे भव्य, दिव्य आहे, त्यापुढे नम्र होण्यात मजा आहे. अहं म्हणणारा जेव्हा ‘दासोहं’ म्हणतो तेव्हा त्याला आनंदाचा गर्व असतो. असं लहानपण संत तुकोबाही देवाला मागतात.‘‘हेचि दान देगा देवातुझा विसर न व्हावागुण गाईन आवडीहेचि माझी सर्व जोडी’’अपूर्व मागणं मागितलं आहे. आशीर्वाद देणारा तर मोठा असतोच पण तुकोबाने मागणाराही मोठा केला आहे. उपाधीवंत कसा असतो याचं उदाहरण देताना समर्थ शिवरायांकडे बोट दाखवतात.‘‘निश्चयाचा महामेरूबहुत जनांसी आधारूअखंड स्थितीचा निर्धारूश्रीमंतयोगी’’अशा पुरुषाचं कर्तृत्व, नेतृत्व, जाणतेपण मानायलाच हवं. त्याच्या सद्गुणांचं कौतुक करावं, सुज्ञ समाजाने त्याची गुणवत्ता पारखून त्याला उपाधी बहाल केली आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक