शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अनित्यबोध जागरूक हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:31 IST

- फरेदुन भुजवाला मानसिक, वाचिक वा शारीरिक आपण जे काही कर्म करतो ते स्वत:चा एक संस्कार बनविते़ ते प्रत्येकाच्या ...

- फरेदुन भुजवालामानसिक, वाचिक वा शारीरिक आपण जे काही कर्म करतो ते स्वत:चा एक संस्कार बनविते़ ते प्रत्येकाच्या खात्यात जमा-खर्चाच्या रूपाने जोडले जातात़ याप्रकारे प्रत्येकाच्या खात्यात चांगले वा वाईट संस्कार जमा होत राहतात़ त्यामुळे जीवनधारा चालत राहते़ जीवन चालत राहील तेव्हा निश्चित रूपाने दु:ख व अंती मृत्यू येतोच़ या संस्कारापासून मुक्ती तेव्हाच मिळू शकते, जेव्हा कोणी अनित्य, दु:ख व अनात्मता योग्यप्रकारे समजेल़ याच, तिन्हींना योग्यप्रकारे समजूनच संस्कारापासून मुक्त होता येऊ शकते़ विपश्यना अभ्यासात प्रगतीसाठी प्रत्येकवेळी, जिथंपर्यंत शक्य असेल तिथंपर्यंत अनित्यतेला सतत जाणत राहिले पाहिजे़

भगवान बुद्ध यांनी भिक्षुंना सांगितले आहे की, सर्ववेळी जरी ते बसले असतील, उभे असतील, चालत असतील अथवा झोपले असतील,तरीही अनित्य, दु:ख व अनात्मची जाणीव ठेवली पाहिजे, म्हणजे त्याची स्मृती कायम असली पाहिजे़ जर आपण प्रत्येक क्षणी जाणत राहाल की, सर्व संस्कार अनित्य आहेत, तर निश्चितच एकवेळ येईल जेव्हा लक्ष्याची प्राप्ती होईल, असे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांचे गुरू विपश्यनाचार्य सयाजी उ. बा. खिन यांनी प्रवचनात सांगितले आहे़ ते म्हणतात, अनित्येतचा खरा अर्थ आहे, जे नित्य नाही़ जे शाश्वत नाही़ म्हणजे, हे जाणणे की जगात जितक्या वस्तू आहेत, सजीव अथवा निर्जीव, त्या स्थायी नाहीत, नित्य नाहीत, अर्थात सतत परिवर्तनशील आहेत़ भगवान बुद्ध यांनी ४५ वर्षे जो विपश्यना अभ्यास शिकविला त्याचे सार हेच आहे़ युवराज सिद्धार्थ गौतम यांनी सहा वर्षे अथक प्रयत्नकरून विपश्यना विद्या शोधून काढली़ ही विद्यात्यांनी स्वत:पुरती मर्यादित न ठेवता सर्वांना दिली़ ही विद्या देताना त्यांनी स्त्री, पुरूष, गरीब, श्रीमंत,असा कोणताही भेद केला नाही, असे विपश्यनाचार्य सयाजी उ. बा. खिन यांनी वेळोवेळी आपल्या प्रवचनात सांगितले आहे़