शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

देवदूतांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 04:13 IST

आपण सर्वांनी देवदूतांबद्दल ऐकलेले आहे. आध्यात्मिक पुस्तकात त्यांच्याबद्दल नेहमीच लिहून येते.

- डॉ. मेहरा श्रीखंडेआपण सर्वांनी देवदूतांबद्दल ऐकलेले आहे. आध्यात्मिक पुस्तकात त्यांच्याबद्दल नेहमीच लिहून येते. ते ईश्वराचे संदेशवाहक व आपल्याला मदत करणारी माणसे आहेत. देवदूत हे प्रकाशीय असून ते जगामध्ये ईश्वराच्या इच्छेचा प्रसार करतात. वलयांकित देवदूतांव्यतिरिक्त आपल्या बरोबर आणखी दोन रक्षण करणारे व मार्ग दाखिवणारे देवदूत असतात व ते आपल्यावर कायम लक्ष ठेवतात. ते अदृश्य असणारे आपले मित्र असून ते आपली मदत करतात व आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात. ते हे सर्व आपल्या दृष्टिआड व आपल्याला कळणार नाही, अशा पद्धतीने करतात. ते आपल्या इच्छेविरुद्ध आपल्या मार्गात पडत नाहीत. जेव्हा आपल्याला त्यांची मदत लागेल त्याचवेळी ते मदतीचा हात पुढे करतात. तुम्हाला त्यांच्याशी संपर्क केल्यावर कधीही एकटे वाटत नाही. तुम्हाला हे कळतं की कुणीतरी तुमच्यासाठी आहे. देवदूत व खाली आलेले शिक्षक यांच्याशी संपर्क साधणे तसे कठीण नाही. विचारा व तुम्हाला ते मिळेल ही गोष्ट इथे बरोबर लागू पडते. ही किल्ली अशी आहे की तुमचा पूर्ण गर्व जाणे व मनाचा ताबा राहणे हे जरुरीचे आहे. सगळ्या कौशल्यांसारखे हेही आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. महत्त्वाची गोष्ट तुमचा विश्वास. जेवढा जास्त विश्वास तेवढेच संपर्क करणे सोपे, असे म्हटले जाते. आध्यात्मावर प्रगाढ विश्वास ठेवला तर ते शक्य होते. देवदूतांसारख्या कल्पना सर्वसामान्यांमध्ये पसरल्या त्यालाही कारण आहे. आपलं दु:ख ऐकणारं, त्याचा विचार करणारं आणि ते देवापर्यंत पोहोचवणारं कुणीतरी आहे, या कल्पनेनंही मानवाचं दु:ख सहन करण्याची तसंच त्याला तोंड देण्याची शक्ती वाढते. म्हणूनच देवदूताची संकल्पना रास्त ठरते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक